आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
पंतप्रधान नरेंद्र माेदींच्या हस्ते शनिवारी हिमाचल प्रदेशातील राेहतांगमध्ये मनाली-लेह महामार्गावर जगातील सर्वाधिक लांबीचा बाेगदा ‘अटल बाेगद्या’चे उद्घाटन झाले. याप्रसंगी माेदींनी तत्कालीन यूपीए सरकारवर निशाणाही साधला. माेदी म्हणाले, आधी देशात सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या प्रकल्पांकडे गांभीर्याने पाहिले गेले नसावे. लष्करी क्षमतांना राेखण्याचेही प्रयत्न झाले. २००२ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या बाेगद्याच्या संपर्क मार्गाचे भूमिपूजन केले हाेते. त्यानंतर संपुआ सरकारला या प्रकल्पाचे जवळपास विस्मरण झाले. बाेगद्याचे काम संथगतीने सुरू हाेते. ते पाहता हे काम २०४० पर्यंत पूर्ण झाले असते. मात्र, २०१४ मध्ये रालाेआ सरकार सत्तेवर आले आणि त्यानंतर या प्रकल्पाला गती मिळाली. प्रकल्प पूर्ण हाेण्यासाठी ३२०० काेटी रुपये खर्च आला.
गेल्या सरकारच्या कामातील विलंबामुळे खर्च तीनपटीने वाढला. मागील सरकार असते तर किती खर्च वाढला असता काेण जाणे? यूपीए सरकारने लडाखमध्ये दाैलतबेग आेल्डी हवाई पट्टी तयार करण्याची इच्छाशक्ती दाखवली हाेती. खरे तर मागील सरकारने अशा सामरिक महत्त्व असलेल्या अनेक प्रकल्पांना लटकावले हाेते. ईशान्य व अरुणाचलला जाेडणाऱ्या सेतूचे कामही अटलजींच्या सरकारने सुरू केले हाेते. संपुआ सरकारने तेदेखील लटकावले. बिहारच्या काेसी पुलाबाबतही अशीच वागणूक पाहायला िमळाली हाेती, असे माेदींनी सांगितले.
विरोध असला तरी सुधारणा करत राहणार : माेदी
माेदींनी कुलूमध्ये एक जाहीर सभा घेतली. ते म्हणाले, कायद्याद्वारे शेतकऱ्यांना लाभ मिळत राहील. नवीन व्यवस्था दलालांवर प्रहार करणारी आहे. गेल्या शतकातील नियम व कायद्यांद्वारे पुढील शतकात नेता येऊ शकत नाहीत. म्हणूनच परिवर्तनास स्वार्थी राजकारणासाठी कितीही विराेध झाला तरी देशाला आत्मनिर्भर करण्यासाठी सुधारणांचा कार्यक्रम सुरूच राहील, असे माेदींनी स्पष्ट केले.
लडाख : गलवानच्या शहिदांचे स्मारक
छायाचित्र लडाखच्या दाैलतबेग आेल्डीचे आहे. गलवान खाेऱ्यात चिनी हल्ल्यांत शहीद २० सैनिकांच्या स्मरणार्थ स्मारक तयार करण्यात आले आहे. याच वर्षी १५ जूनच्या रात्री गलवान खाेऱ्यात चिनी आणि भारतीय सैनिकांदरम्यान हिंसक धुमश्चक्री झाली हाेती. त्यात १६ व्या बिहार रेजिमेंटचे कमांडिंग अधिकारी कर्नल बी. संताेष बाबू यांच्यासह १९ अन्य सैनिक शहीद झाले हाेते. या सैनिकांची नावे दिल्ली येथील राष्ट्रीय युद्ध स्मारकावर काेरण्याचे काम सुरू आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.