आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांना दिवाळी भेट:केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपये आणि डिझेलवर 10 रुपयांची केली कपात, आजपासून लागू होणार नवीन दर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या दरांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांनी तर डिझेलवर 10 रुपयांनी कपात करण्याची घोषणा केली आहे. आजपासून दिवाळीच्या दिवशी नवीन दर लागू होतील.

आज नाही वाढले भाव
आज छोटी दिवाळीच्या दिवशी सर्वसामान्यांना दिलासा मिळाला. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. अनेक शहरांमध्ये डिझेलने 110 रुपये तर पेट्रोलने 121 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा दर 110 रुपये प्रति लिटरच्या पुढे गेला आहे. त्याचवेळी डिझेल 98.42 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. गेल्या वेळी 5 सप्टेंबर रोजी दर कमी करण्यात आले होते, त्यानंतर देशातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल 15 पैशांनी स्वस्त झाले होते.

28 दिवसांत पेट्रोल 8.85 रुपयांनी महागले आहे
गेल्या 28 सप्टेंबरला पेट्रोल 20 पैशांनी महागले होते, तर डिझेलही 25 पैशांनी महागले होते. प्रत्यक्षात सप्टेंबरच्या शेवटच्या दिवसांपासून वाढलेले पेट्रोलचे दर मंगळवारपर्यंत कायम होते. पेट्रोलच्या दरांवर नजर टाकली तर 28 दिवसांत पेट्रोल 8.85 रुपयांनी महागले आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने विक्रमी पातळी गाठली आहे.

बातम्या आणखी आहेत...