आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Update News | Couple Enters Rashtrapati Bhavan After Intoxication, Court Sentences Him To 14 Days In Jail

धक्कादायक:दारुच्या नशेत जोडप्याने राष्ट्रपती भवनात घुसण्याचा केला प्रयत्न, कोर्टाने 14 दिवसांची सुनावली कोठडी

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दारू पिऊन राष्ट्रपती भवनात प्रवेश करणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. दिल्ली पोलिसांनी या जोडप्याविरुद्ध एफआयआर नोंदवला आणि बुधवारी त्यांना न्यायालयात हजर केले, तेथून दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोघांनी जबरदस्तीने राष्ट्रपती भवनात घुसण्याचा प्रयत्न केला होता.

मिडिया रिपोर्टनुसार, ही घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती, जेव्हा एक जोडपे कारमधून राष्ट्रपती भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचले आणि आत जाण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्यांना पकडले. बराच वेळ चौकशी केल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. मात्र, अटक करण्यात आलेले दोघेजण चुकून राष्ट्रपती भवनात घुसले की जाणूनबुजून हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. मात्र, याबाबत दिल्ली पोलिसांचा तपास सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...