आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Update News | Four Round Firing In Mim Chief Asaduddi Owaisi Vehicl In Uattar Pradesh

ओवेसींच्या गाडीवर गोळीबार:गाझियाबादमध्ये एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार; घटनेनंतर ओवेसी म्हणाले- मी सुरक्षित आहे

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशमध्ये AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला आहे. हापूर जिल्ह्यातील पिलखुवा येथून सभा आटोपून ते गाझियाबादला परतत होते. गाझियाबादमधील डासना टोल प्लाझाजवळ त्यांच्या गाडीवर पाच गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्या गाडीवर गोळ्यांच्या खुणा स्पष्ट दिसत आहेत.

घटनेनंतर ओवेसी यांनी ट्विटरवरुन माहिती दिली आहे की, आपल्या गाडीवर चार राऊंड फायर झाल्याचा दावा खासदार ओवेसींनी केला आहे. त्यानंतर आपली गाडी पंक्चर झाली आणि आपण दुसऱ्या गाडीच्या मदतीने त्या ठिकाणाहून निघाल्याचा दावाही त्यांनी केला. या ट्वीटमध्ये त्यांनी गोळीबाराच्या खुणा असलेला गाडीचा फोटोही शेअर केला आहे.

बातम्या आणखी आहेत...