आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंझमामचा खुलासा:मला ह्रदयविकाराचा झटका आलेला नाही, इंझमाम-उल-हकने केला खुलासा; आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व लोकांचे मानले आभार

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू इंझमाम उल हकला लाहोर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यापूर्वी त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त आले होते. मात्र, इंझमामने स्वतः हे वृत्त फेटाळून लावत मला हृदयविकाराचा झटका आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नियमित मी तपासणीसाठी रुग्णालयात गेलो होतो, असे त्यांनी म्हंटले आहे.

इंझमामला हृदयविकाराचा झटका आल्याचे वृत्त सगळीकडे पसरले होते. त्यावर सचिन तेंडुलकरने देखील ट्विट करत त्याच्यांसाठी प्रार्थना केली होती. सचिनने लिहिले होते की, ‘इन्झमाम तू लवकर बरा हो, मला हेच हवे आहे. तू नेहमीच शांत पण मजबूत आणि मैदानावर एक फायटर राहिला आहेस. मी आशा आणि प्रार्थना करतो, की तू या परिस्थितीतून बाहेर पडशील.

दरम्यान, इंझमामने स्पष्ट केले आहे की हृदयविकाराचा झटका आला नव्हता. त्यांच्या मते, धमनी ब्लॉक झाल्यामुळे त्याला अँजिओप्लास्टी करावी लागली. पोटात दुखत असल्यामुळे तो रुग्णालयात गेला होता आणि नियमित तपासणी दरम्यान धमनी ब्लॉक असल्याचे आढळले. याबाबत इंझमामने आपल्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ पोस्ट करुन ही माहिती दिली आहे. तसेच आरोग्यासाठी प्रार्थना करणाऱ्या सर्व लोकांचे मानले आभार इंझमामने आभार आभार मानले आहे.

बातम्या आणखी आहेत...