आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यप्रदेशात नक्षलवाद्यांकडून 2 जणांची हत्या:घरातून खेचून नेत झाडाला बांधून केली मारहाण, नंतर गोळ्या झाडल्या; मुख्यमंत्र्यांची कुटुंबातील एका सदस्याला नोकरी देण्याची घोषणा

16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये नक्षलवाद्यांनी दोन गावकऱ्यांची हत्या केली. प्राथमिक माहितीत ही हत्या एका गुप्तचराच्या संशयावरून करण्यात आल्याचे समोर आले आहे. 7 नोव्हेंबर रोजी पोलिसांनी लांजीच्या जंगलातून स्फोटके जप्त केली होती, गावकऱ्यांनी पोलिसांना स्फोटकांची माहिती दिल्याचा संशय नक्षलवाद्यांनी घेतला होता. घटना मालखेडी गावातील आहे. शनिवारी सकाळी गावकऱ्यांचे मृतदेह गावाबाहेर आढळून आले. जिल्ह्यात दीड वर्षात नक्षलवाद्यांनी तिसऱ्यांदा ग्रामस्थांची हत्या केली आहे.

बेहार तहसीलच्या मालखेडी गावातील संतोष (48) आणि जगदीश यादव (45) यांची शुक्रवारी रात्री उशिरा हत्या करण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, जगदीश आणि संतोष गावात धाण्य दळत असताना चार नक्षलवादी आले. त्यात दोन महिलांचाही समावेश होता. चौघांच्या हातात बंदूक होती. त्यांनी दोन्ही गावकऱ्यांची नावे विचारून त्यांना गावाबाहेर ओढून झाडाला बांधले. प्रथम त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. यानंतर दोघांचीही गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दोन्ही मृतांची घरे समोरासमोर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. रात्री गोळीबाराचा आवाजही ऐकू आला. सकाळी दोघांचे मृतदेह पडलेले आढळून आले. जवळच एक निळी दोरी आणि काही पत्रकेही पडली होती.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये आणि एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा त्यांनी केली. त्यांचे मृतदेह सकाळी ग्रामस्थांनी पाहिले. घटनास्थळी पोहोचलेले पोलिस आणि हॉक फोर्सचे जवान परिसरातील सर्च ऑपरेशनमध्ये व्यस्त आहेत. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नक्षलवाद्यांनी बदला घेण्याच्या उद्देशाने दोन्ही गावकऱ्यांची हत्या केली आहे.

खुनाचे हे देखील कारण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्येमागे दोन कारणे असू शकतात. सर्वप्रथम, गेल्या वर्षी 6 नोव्हेंबर रोजी मालखेडी गावात पोलिसांनी 8 लाखांचे बक्षीस असलेली नक्षलवादी शारदा उर्फ ​​पुजे (25) हिला चकमकीत ठार केले होते. आपल्या साथीदाराच्या मृत्यूचा बदला म्हणून नक्षलवाद्यांनी दोघांची हत्या केली असावी, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...