आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Update News | Nitin Gadkari Demolished His Father in law’s House For Road Works

गडकरींचे किस्से:नवीन लग्न झालेले असताना जेव्हा गडकरींनी सासऱ्याच्याच घरावर फिरवले होते बुलडोझर, पत्नीला कल्पनाही नव्हती! त्यांनीच सांगितला किस्सा...

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली ते मुंबई अवघ्या 12 तासांचा प्रवास लवकरच साकार होणार आहे. हरियाणा, राजस्थान आणि गुजरातसह विविध राज्यांतून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई द्रुतगती महामार्गाचे बांधकाम वेगाने सुरू आहे. दरम्यान, आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्यासह हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल यांनी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेचा आढावा घेतला.

यानिमित्ताने हरियाणाच्या सोहनामध्ये झालेल्या कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी संबोधित केलं. आपल्या भाषणात नितीन गडकरी यांनी एक गौप्यस्फोट केला.

'माझं नुकतंच लग्न झालं होतं, तेव्हा रामटेकमध्ये रस्ते बांधकाम सुरु होतं, आणि माझ्या सासऱ्यांचं घर रस्त्याच्या मधोमध येत होतं. यावेळी पत्नीला कोणतीही कल्पना न देता सासऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालवला, तो रस्ता पूर्ण केला', असा गौप्यस्फोट नितीन गडकरी यांनी यावेळी केला. यानंतर, सामान्य जनतेची रहदारी सुरळीत झाली.

नितीन गडकरी म्हणाले की, लोकांच्या माध्यमातूनच सरकारकडे पैसा येतो. जर तुम्हाला रस्त्यावर सर्व सुविधा हव्या असतील तर तुम्हाला त्याच्या देखरेखीसाठी टोल टॅक्स भरावा लागेल. खुल्या मैदानावरही विवाह होतात पण त्यासाठीही आपल्याला पैसा खर्च करावा लागतो.

दिल्ली ते मुंबई जोडणारा ग्रीन एक्सप्रेसवेच्या कामाची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. यावेळी कोरोना काळात महामार्गाचे काम थांबलं होते परंतु आता या रस्त्याचे काम पुन्हा सुरळित झाले आहे. १ लाख कोटी रुपये खर्च करुन हा महामार्ग तयार करण्यात येत आहे. दिल्ली ते मुंबई ग्रीन एक्सप्रेस वे १३८० किलोमीटरचा असून अवघ्या १२ तासात मुंबई ते दिल्ली अंतर पुर्ण करता येणार असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...