आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • UPI Payments Can Now Be Made Without A Smartphone Or Internet; RBI Launches New System | RBI New Service 123 Pay

आरबीआयची 123पे सेवा:आता स्मार्टफोन अन् इंटरनेट नसतानाही करता येणार UPI पेमेंट; आरबीआयने सुरू केली 'ही' नवीन सेवा

नवी दिल्ली7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी आज एक नवीन सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता देशातील 40 कोटींपेक्षा अधिक फीचर फोनवर म्हणजेच साध्या मोबाइलवर ग्राहकांना डिजीटल पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करता येणार आहे. ज्या लोकांकडे इंटरनेट कनेक्शन नाही, ते युपीआय '123पे' या नवीन प्रणालीद्वारे डिजीटल पैशांची देवाण-घेवाण करू शकणार आहेत. विशेष म्हणजे या सेवेचा लाभ ग्राहकांना साध्या फिचर फोनमध्ये देखील घेता येणार आहे.

शक्तिकांत दास म्हणाले की, आतापर्यत यूपीआयची सेवा केवळ स्मार्टफोनवरच उपलब्ध होती. त्यामुळे या सेवेचा लाभ उच्चवर्गीयांना होत होता, मात्र गरिबांकडे विशेष म्हणजे ग्रामीण भागात स्मार्टफोन नसल्याने अनेक जण या युपीआय सेवेपासून वंचित होते. पुढे शक्तिकांत दास म्हणाले की, 2021-22 या आर्थिक वर्षात आतापर्यंत यूपीआय प्रणालीद्वारे सुमारे 76 लाख कोटींचे व्यवहार झाले आहे. तर गेल्यावर्षी हा आकडा 41 लाख कोटी इतका होता. शक्तिकांत दास म्हणाले की, या नवीन प्रणालीमुळे लवकरच हा आकडा 100 लाख कोटींपर्यंत जाणार असल्याचे म्हटले आहे.

एका सर्वेक्षणानूसार, देशात सुमारे 4 लाख लोकांकडे फीचर म्हणजेच साधे मोबाइल आहेत. डेप्युटी गव्हर्नर टी रविशंकर यांनी सांगितले की, सध्या अशा वापरकर्त्यांना यू.एस.एस.डी. आधारित सेवांद्वारे UPI सेवा उपलब्ध आहेत, परंतु ते खूपच त्रासदायक आहे आणि सर्व मोबाइल ऑपरेटर अशा सेवांना परवानगी देत ​​नाहीत.

आरबीआयने सांगितले की, फिचर फोनच्या माध्यमातून केवळ चार पर्यांयाचा वापर करुन पैशांची ऑनलाइन देवाण घेवाण करता येऊ शकते. यामध्ये 1) कॉलिंग IVR (इंटरएक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स) नंबर, 2) फीचर फोनमधील अॅप कार्यक्षमता, 3) मिस्ड कॉल आधारित पद्धत आणि 4) प्रॉक्सिमिटी व्हॉइस आधारित पेमेंट यांचा समावेश आहे.

या सेवाचा वापर करुन ग्राहक आपल्या मित्र-कुटुंबाला ऑनलाईन पद्धतीने पैशांची देवाण-घेवाण करू शकतील. सोबतच ऑनलाईन पेमेंट, वाहनांचे फास्ट टॅग, मोबाइल रिचार्ज या सारख्या सुविधांचा लाभ देखील ग्राहकांना घेता येणार आहे. दास यांनी मंगळवारी डिजीटल पेमेंटसाठी एक हेल्पलाईन नंबर देखील जारी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...