आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uploaded Old Videos Of Jyotiraditya Taking An Aggressive Stance Against The Modi Government

मंत्री बनताच ज्योतिरादित्यांचे फेसबुक अकाउंट हॅक:मोदी सरकारविरोधात पोस्ट केलेले जुने व्हिडिओ झाले अपलोड, काही मिनिटांमध्ये रिकव्हर झाले अकाउंट

ग्वाल्हेरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अकाउंट हॅक झाल्याच्या बातमीने खळबळ

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे मोदी मंत्रिमंडळात सामील होताच त्यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याची बातमी सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्रमक भाषणाचा जुना व्हिडिओ कोणीतरी त्यांच्या फेसबुक वॉलवर दुपारी 12: 23 वाजता अपलोड केल्याचे सांगण्यात येत आहे. यात ते मोदी सरकारच्या उणीवा सांगत आहेत. हा व्हिडिओ शिंदे कॉंग्रेसमध्ये होते त्या काळातील आहेत.

ही बातमी मिळताच सायबर टीम सक्रिय झाली. हॅकिंग काही मिनिटांतच थांबवण्यात आल्याचा दावा केला जात आहे. यासह अपलोड केलेले व्हिडिओ हटवण्यात आले. ज्या डेटाला धक्का पोहोचवण्यात आला होता, ते देखील रिकव्हर करण्यात आले आहेत. परंतु, ग्वाल्हेर पोलिसांनी या प्रकरणाची माहिती नसल्याचे म्हटले आहे. भोपाळमधील शिंदे समर्थक कृष्णा घाटगे यांनी याची पुष्टी केली आहे.

मार्च 2020 मध्ये कॉंग्रेस सोडलेल्या आणि भाजपमध्ये सामील झालेल्या शिंदे यांचा बुधवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. त्यांना कॅबिनेट मंत्री बनवताना नागरी उड्डाण खात्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे. ते राज्यसभेचे खासदार आहेत.

अकाउंट हॅक झाल्याच्या बातमीने खळबळ
शिंदे यांचे फेसबुक अकाउंट हॅक झाल्याच्या बातमीमुळे खळबळ उडाली. सायबर टीम क्षणो क्षणी खात्यावर नजर ठेवते. अशा परिस्थितीत, हॅकिंगची माहिती मिळताच तज्ञांने त्वरित पुढाकार घेतला. काही मिनिटांत हॅकिंग थांबवले गेले. यानंतर अपलोड केलेले फोटो, व्हिडिओ हटवण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...