आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर 3 फूट उंचीच्या अझीम मन्सूरींच लग्न झालं:बेगम बुशराची उंचीही 3 फूट, लग्नानंतर म्हणाले - आज खूप आनंदात, माझी बेगम खूप सुंदर

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखेर शामली येथील 3 फूट अजीम मन्सूरी यांचे आज लग्न झाले आहे. अझीम यांचे वर्षानुवर्षेचे स्वप्न साकार झाले असून त्यांना आपल्या स्वप्नांची राणी मिळाली आहे. अझीम यांचा विवाह हापूर येथील बुशरासोबत झाला. बुशराची उंचीही 3 फूट आहे. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबे खूप आनंदात असून लग्नानंतर त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या.

लग्नानंतर बुशरा आणि अझीम एकत्र बसले.
लग्नानंतर बुशरा आणि अझीम एकत्र बसले.

लग्नानंतर अझीम यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले की, अल्लाहने माझे ऐकले. आज माझी बेगम माझ्या घरी येईल. नवीन सून आल्याने माझे कुटुंब आनंदित झाले आहे. माझी बेगम खूप सुंदर आहे.

अझीम ​​​​​​​यांच्या वडिलांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, आज माझ्या डोळ्यासमोर माझ्या मुलाला मी नवरदेव होताना पाहिले. माझी इच्छा पुर्ण झाली. मी आहे तोपर्यंत त्याने लग्न करावे अशी माझी इच्छा होती.

कुटुंबीयांनी त्यांना कडेवर घेऊन घरातून खाली आणले.
कुटुंबीयांनी त्यांना कडेवर घेऊन घरातून खाली आणले.

मुली देत होत्या लग्नाला नकार

अझीम ​​​​​​​मन्सूरी गेल्या अनेक वर्षांपासून लग्नाच्या चिंतेत होते. उंची 3 फूट असल्याने कोणतीही मुलगी त्यांच्याशी लग्न करण्यास तयार नव्हती. यामुळे निराश होऊन त्यांनी मुख्यमंत्र्यांकडेही मदत मागितली. पण इच्छा असूनही कोणीही मदत करू शकले नाही. ते सतत 'कुणीतरी माझं लग्न करून द्या', असे म्हणत असतं.

आपल्या एका नातेवाईकासोबत बसलेली बुशरा.
आपल्या एका नातेवाईकासोबत बसलेली बुशरा.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बुशरा सापडली

माझ लग्न करून द्या, उंची कमी असल्यामुळे लग्न जमत नाहीये, अशी तक्रार घेऊन अझीम यांनी चक्क पोलीस स्टेशन गाठले होते. ही गोष्ट सोशल मीडियावरती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर त्यांच्यासाठी लग्नाचे अनेक प्रस्ताव आले. गाझियाबाद, दिल्ली, नोएडा, मेरठसह अनेक ठिकाणांहून त्यांच्यासाठी संबंध येऊ लागले. पण, त्यांना आवडला ती हापुडची बुशरा. विशेष म्हणजे बुशराची उंचीही 3 फूट आहे. ती मोहल्ला माजीदपुरा येथील रहिवासी आहे. बुशराने बी.कॉम पर्यंत शिक्षण घेतले आहे.

लग्नासाठी बुशराचे घर सजवले
लग्नासाठी बुशराचे हापुड येथील घर खूप सुंदर सजले होते. घरातील लोक लग्नांची वरात येण्याची वाट पाहत होते. वरात काढण्यासाठी मोठा थाटमाट तयार करण्यात आला होता. बुशरा वधूचे कपडे परिधान करून तिच्या होणाऱ्या पतीची वाट पाहत होती.

तर दुसरीकडे अझीमही लग्नासाठी शेरवानी घालून तयार झाले. अवघ्या दोन-तीन दिवसांपुर्वी ते लग्नाची शेरवानीसाठी शामली येथील एका शिंपीकडे गेले होते. माझे 2 नोव्हेंबरला लग्न आहे. मला छान शेरवानी बनवून द्या, असे त्यांनी टेलरला सांगितले होते. आजपासून अझीम ​​​​​​​यांनी बुशरासोबत आयुष्याची नवीन सुरुवात केली आहे.

बातम्या आणखी आहेत...