आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय लोकसेवा आयोग (यूपीएससी) सनदी सेवा परीक्षेत पदवीत (यूजी) ह्युमॅनिटीज आणि विज्ञान घेणाऱ्या उमेदवारांच्या निवडीचा टक्का वाढला आहे. वैद्यकीय आणि अभियांत्रिकी घेणाऱ्यांच्या यशाचा टक्का घटला आहे. यूपीएससीचा वार्षिक अहवाल २०२०-२१ नुसार उच्च पदवी असणाऱ्यांमध्ये मेडिकल सायन्सच्या उमेदवारांची निवड वाढली आहे. सर्वसाधारण पदवीच्या उमेदवारांचा सक्सेस रेट ३८.७% आणि उच्चशिक्षित उमेदवारांचा यशाचा टक्का ४४.२% राहिला. सीएसई २०१९ मध्ये ११,३५,२६१ अर्जदार होते. ५,६८,२८२ पूर्व परीक्षेला बसले आणि ११,८४५ ची निवड मुख्य परीक्षेला झाली. यूपीएससी देणाऱ्या विद्यार्थिनींत १०% पहिल्याच प्रयत्नात निवडल्या जातात. मुलांमध्ये हा आकडा ७% आहे. दुसऱ्या प्रयत्नात १६.८% मुली निवडल्या जातात.
प्रादेशिक भाषेत मुलाखत देणारे घटले, इंग्रजीत वाढले
हिंदीसह प्रादेशिक भाषांमध्ये मुलाखत देणारे उमेदवार घटले. २०१९ मध्ये २३०२ उमेदवारांनी मुलाखत दिली. यात २०६ (८.९४%) नी प्रादेशिक भाषा निवडली. २०१९ मध्ये हिंदीत १७९ नी मुलाखत दिली. वर्षभरापूर्वी हा आकडा २०४ होता. २०१८ मध्ये २५० नी प्रादेशिक भाषेत मुलाखत दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.