आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • UPSC Postponed The Interview Round For IAS 2020, New Dates Will Be Announced Soon; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना महामारीचे परिणाम:संघ लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा परीक्षा 2020 च्या मुलाखतींना स्थगिती; 796 रिक्त जागांसाठी 26 एप्रिलपासून सुरु होणार होत्या मुलाखती

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाखतीची तारीख आयोगाकडून upsc.gov.in या संकेतस्थळांवर लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे ही सांगितले.

देशात वाढत्या कोरोनाचा प्रभाव लक्षात घेता संघ लोकसेवा आयोगाने 26 एप्रिलपासून सुरु होणारी नागरी सेवा परीक्षा 2020 ची मुलाखत पुढे ढकलली आहे. दरम्यान, युपीएससीकडून नागरी सेवा परिक्षेच्या वतीने 796 रिक्त जागांसाठी या मुलाखाती होणार होत्या. मुलाखती या महिन्याच्या 26 तारखेपासून तर 18 जूनपर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या. संघ लोकसेवा आयोगाने या संदर्भांत एक नोटीस जारी करत माहिती दिली.

अधिसुचना प्रसिद्ध करत दिली माहिती
या संदर्भांत आयोगाने अधिकृत अधिसुचना प्रसिद्ध करत सांगितले की, कोरोना महामारीमुळे होणारी सध्याची परिस्थिती लक्षात घेता नागरी सेवा परीक्षा 2020 च्या पर्सनालिटी टेस्ट किंवा मुलाखतीला काही काळासाठी स्थगित करण्यात येत आहे. तसेच या मुलाखतीची तारीख आयोगाकडून upsc.gov.in या संकेतस्थळांवर लवकरच प्रसिद्ध करणार असल्याचे ही सांगितले.

796 रिक्त जागांसाठी होणार होती मुलाखत
या मुलाखतीमध्ये एकूण 2000 परिक्षार्थींचा समावेश असून यामधून 769 जागा भरण्यात येणार आहे. संघ लोकसेवा आयोगाकडून नागरी सेवा पर‍िक्षेचे आयोजन केले जाते. दरम्यान, नागरी सेवा परीक्षा ही तीन टप्प्यांमध्ये होते. यामधून भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस), भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस) आणि भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) आदी अधिकाऱ्यांचा समावेश होतो.

बातम्या आणखी आहेत...