आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Urdu Poet Munawwar Rana Controversial Statement; FIR Files In Lucknow Hazratganj Police Station

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुनव्वर राणांविरोधात FIR:राणा यांनी केले फ्रांसमधील दहशतवादी हल्ल्याचे समर्थन; लखनऊमध्ये तक्रार दाखल

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फ्रान्समध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे समर्थन करणे प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांना महागात पडले आहे. या प्रकरणावर वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मुनव्वर राणांविरोधात FIR दाखल झाली आहे. लखनऊच्या हजरतगंज पोलिस स्टेशनमध्ये नकारात्मकता पसरवणे, शांती भंग करणे आणि आयटी अॅक्ट अंतर्गत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राणा यांनी फ्रांसणध्ये 16 ऑक्टोबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बरोबर म्हटले होते. राणा म्हणाले होते की, "हल्ला करणाऱ्याच्या जागी मी असतो, तरी हेच केले असते. कोणाला इतके पण मजबुर करुन नका की, तो खून करायला मागे-पुढे पाहणार नाही. मोहम्मद साहबचे कार्टून काढून हल्लेखोराला मजबुर करण्यात आले. जर एखाद्याने भगवान रामाचे कार्टून काढले, तर मी त्याचा खून करेल." राणा पुढे म्हणाले की, "मुस्लिमांना डिवचण्यासाठी वादग्रस्त कार्टुन काढण्यात आले. जगात हजारो वर्षांपासून ऑनर किलिंग होत आहे. अखलाक प्रकरणात काय झाले? तेव्हा कोणाला त्रास झाला नाही.'

फ्रांसमध्ये काय झाले ?

पॅरिसच्या पास कॉन्फ्लांस सेन्ट होनोरिन परिसरातील एका शाळेत शिक्षकाने पैगंबर मोहम्मद साहब यांचे कार्टून दाखवले होते. यानंतर हल्लेखोरांनी 16 ऑक्टोबरला त्या शिक्षकाची हत्या केली होती. फ्रांसचे राष्ट्रपती इमॅनुअल मॅक्रों यांनी या घटनेला दहशतवादी हल्ला म्हटले होते. यानंतर हल्लेखोराला पोलिसांनी चकमकीत ठार केले.