आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Urvashi, Riddhima Also Participate In 'Har Ghar Triranga' Campaign; Wrote Proud To Be An Indian

पत्नी गौरीसोबत शाहरुखने फडकावला तिरंगा:उर्वशी, रिद्धिमा देखील झाले 'हर घर तिरंगा' मोहिमेत सहभागी; लिहिले - भारतीय असल्याचा अभिमान

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारत सरकारने 'स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव' साजरा करण्यासाठी 'हर घर तिरंगा' मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत प्रत्येकजण आपापल्या घरी तिरंगा लावून या मोहिमेत सहभागी होत आहे.

या मोहिमेत पत्नी गौरीसह शाहरुख खाननेही सहभाग घेतला आणि आपल्या दोन मुलांसह मन्नतच्या घरावर ध्वजारोहण केले. त्याचा व्हिडिओही त्याने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. शाहरुखशिवाय उर्वशी रौतेला, रिद्धिमा साहनी, राज कुमार राव यांनीही देखील घरोघरी तिरंगा फडकावून केंद्र सरकारच्या या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.

शाहरुखने इन्स्टावर शेअर केला व्हिडिओ

शाहरुख खानने त्याच्या इन्स्टा अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आमच्या लहान मुलांना आणि येणाऱ्या पिढीला हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या क्रांतिकारकांनी किती बलिदान दिले आहे हे शिकवण्यासाठी त्यांना वेळ लागेल. पण मुलांनी ध्वज फडकावल्याने त्यांचा आम्हाला अधिक अभिमान, आनंद वाटला गौरी खाननेही पती आणि मुलांसोबत ध्वजारोहण करतानाचा हा फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, "स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा".

उर्वशी रौतेलाने तिरंगा फडकवतानाचा शेअर केला व्हिडिओ

केंद्र सरकारच्या या मोहिमेअंतर्गत उर्वशी रौतेला हिनेही आपल्या घरावर तिरंगा फडकवला. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती तिरंगा फडकवताना ती दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आपला देश जगातील सर्वात श्रीमंत देश बनू दे. एक उज्वल भविष्य साधूया. " प्रयत्न करा. स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा!"

नीतू कपूर यांची मुलगी रिद्धिमा साहनी हिनेही फडकवला तिरंगा

नीतू कपूरची मुलगी रिद्धिमा साहनी हिनेही तिचा तिरंग्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये ती बाल्कनीत तिरंगा झेंडा हातात धरताना दिसत आहे. तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "स्वातंत्र्याची 75 वर्षे, जय हिंद".

राज कुमार राव यानेही तिरंग्यासोबतचा केला फोटो शेअर

राजकुमार रावने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'हर घर तिरंगा' मोहिमेला पुढे नेत तिरंग्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे.

फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, "विजयी विश्व तिरंगा प्यारा, झंडा ऊंचा रहे हमारा, राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी स्वातंत्र्य, सामर्थ्य आणि यशस्वीतेच्या 75 वर्षात आपण भारताचा तिरंगा ध्वज सतत फडकत राहण्यासाठी आपण योगदान देऊया. आपण आपला राष्ट्रध्वज उंच करूया.

बातम्या आणखी आहेत...