आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शेतकरी आंदोलनात आता अमेरिकेची एंट्री झाली आहे. अमेरिकेने म्हटले की, नव्या कृषी सुधारणांमुळे भारतीय बाजार मजबूत होईल व खासगी गुंतवणूकही वाढेल. दुसरीकडे, अमेरिकी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले की, ‘अमेरिका शांततापूर्ण आंदोलनांचे समर्थन करते, हा लोकशाहीचा भाग आहे. मतभेद चर्चेतून सोडवले पाहिजेत. भारताच्या सुप्रीम कोर्टानेही असेच म्हटले आहे.’ दरम्यान, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, अमेरिकेने कृषी सुधारणांबाबत केलेल्या भारताच्या उपाययोजनांची प्रशंसा केली आहे. ६ जानेवारीला अमेरिकेच्या कॅपिटल हिलमध्ये (संसद) झालेल्या हिंसाचारानंतर जी भावना उमटली होती, तशीच भावना एेतिहासिक लाल किल्ल्यावरील हिंसाचारावर भारतातही उमटली. दोन्ही हिंसक घटनांची चौकशी कायद्यानुसार होत आहे. दुसरीकडे, ब्रिटनमध्ये ई-याचिकेवर लाखो लोकांनी शेतकरी आंदोलनास पाठिंबा दिला. तेथील संसदेत यावर चर्चाही होऊ शकते.
निदर्शने लोकशाहीचा भाग आहेत : अमेरिका
- हिंसाचार प्रकरणामध्ये धर्मेंद्रसिंह हरमनला अटक करण्यात आली आहे. हरमनवर लाल किल्ल्यात हिंसक उपद्रवींना चिथावणी दिल्याचा आरोप आहे.
- गाझीपूर सीमेवर रस्त्यांवर ठोकलेले खिळे पोलिसांनी काढून घेतले. मात्र ते दुसऱ्या ठिकाणी बसवण्यात येणार असल्याचे पोलिस म्हणाले.
- संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात गुरुवारीही विरोधी पक्षांनी गदारोळ घातला. यामुळे राज्यसभा शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आली आहे.
दिल्ली हिंसाचार : आतापर्यंत ४३ वर एफआयआर दाखल
दिल्ली हिंसाचार प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, एकूण ४३ एफआयआर दाखल झाले. पैकी १३ स्पेशल सेलकडे पाठवले आहेत. हिंसाचारात प्रतिबंधित संघटनांचाही सहभाग होता.
गाझीपूर : विरोधी पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी अडवले
नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनास ७१ दिवस झाले आहेत. गाझीपूर सीमेवर गुरुवारी पुन्हा घडामोडी वाढल्या. अकाली दलाच्या खासदार हरसिमरत कौर बादल यांच्यासह १० विरोधी पक्षांचे १५ नेते शेतकऱ्यांना भेटण्यासाठी गाझीपूरकडे निघाले. मात्र पोलिसांनी त्यांना रस्त्यातच अडवले.
ग्रेटाच्या ट्वीटवर शांतताभंगाचा गुन्हा; म्हणाली, मी आताही शेतकऱ्यांसोबतच
स्वीडनची पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्गने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केले हाेते. त्यावर पोलिसांनी शांतता भंग केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ग्रेटा म्हणाली, ‘मी आताही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देते.’ सूत्रांनुसार, एफआयआरमध्ये ग्रेटाचे नाव आरोपी म्हणून नाही. ग्रेटाने ट्वीटमध्ये एक टूलकिट शेअर केली होती. त्यात भारतीय दूतावासांबाहेर निदर्शने करण्याचा सल्ला दिला होता.
- कंगना रनौतचे काही ट्वीट्स ट्विटरने डिलीट केले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्याने ट्वीट हटवल्याचे कंपनीने म्हटले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.