आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • US Government Lifts Restrictions On Vaccine Exports; Poonawala Thanked Biden And Jaishankar

नवी दिल्ली:लसीच्या निर्यातीवरील निर्बंध अमेरिका सरकारने हटवले; पूनावाला यांनी मानले बायडेन, जयशंकर यांचे आभार

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन आणि भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे लसीसंबंधीच्या धोरणात बदल केल्याबद्दल आभार मानले आहेत.

शुक्रवारी सोशल मीडियावर सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ पूनावाला यांनी म्हटले आहे की, या नव्या धोरणामुळे जागतिक पातळीवर तसेच भारताला कच्च्या मालाचा पुरवठा वाढणार आहे. त्यामुळे या महामारीविरुद्धचा लढा अधिक बळकट होऊ शकेल.

अमेरिकेने गुरुवारी अॅस्ट्राझेनेका, नोव्हावॅक्स आणि सनोफीवर लागू असलेले निर्बंध हटवले आहेत. यामुळे लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांना या उत्पादनासाठी पुरेशी साधने व कच्चा माल उपलब्ध होऊ शकणार आहे. शिवाय, भारतासह इतर देशांना लसीच्या निर्मितीसाठी लागणारा कच्चा मालही उपलब्ध होऊ शकणार आहे. यामुळे लसीचे उत्पादन वाढू शकेल. सीरम देशात कोविशील्ड या लसीचे उत्पादन करत आहे. दरम्यान, सीरमला आता स्पुटनिक-व्ही या लसीच्या उत्पादनाचीही परवानगी मिळाली आहे. डीसीजीआयने शुक्रवारी ही मंजुरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...