आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • US In Anger, Donald Trump Threatens, Will Take Revenge If Drug Not Provided; Government Relaxes Ban

निर्यात बंदी:अमेरिकेत संताप, औषध दिले नाही तर बदला घेऊ, डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी; सरकारने बंदी शिथिल केली

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले, मानवतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर केंद्र सरकारने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या हिवतापाच्या औषधाच्या निर्यातीवरील बंदी अंशत: हटवली. या निर्णयामुळे अमेरिकेसह कोरोना महामारीचा उद्रेक झालेल्या देशांत निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे. वैयक्तिक विनंतीनंतरही भारताने औषध पाठवले नाही तर अमेरिका बदला घेईल, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती. त्यानंतर काही वेळातच सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारत प्रथम आपल्या गरजा पूर्ण करेल. त्यानंतर भारतावर विसंबून असलेल्या शेजारी देश व सर्वाधिक संसर्ग झालेल्या देशांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन व पॅरासिटामोलची निर्यात केली जाईल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी सांगितले की, मानवतेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोटी केली की, मित्रोंमध्ये बदल्याची भावना? भारताने सर्वांच्या मदतीसाठी सज्ज राहावे. जीवनावश्यक औषधी व उपकरणे देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणे अनिवार्य आहे.

बातम्या आणखी आहेत...