आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करारशिया-युक्रेन युद्धावर सोमवारी अमेरिकन गुप्तहेर संघटनेने नवी माहिती जारी केली. त्यात या युद्धात रशियाचे 1 लाखांहून अधिक सैनिक मारले गेल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे, गत 5 महिन्यांत या युद्धात 80 हजार सैनिक जखमी झालेत.
अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी इंटेलिजन्सचा दाखला देत सांगितले की, गत 5 महिन्यांत 20 हजारहून अधिक सैनिकांचा मृत्यू झाला. यापैकी निम्म्याहून अधिक सैनिक वॅगनर या प्रायव्हेट लष्कराचे होते. युक्रेनच्या बाखमुत भागात लढताना ते मारले गेले.
रशियाला महत्त्वपूर्ण भाग ताब्यात घेण्यात अपयश
रशिया गत वर्षभरापासून युक्रेनमधील लहान शहरे ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्यात त्याला फारसे यश मिळाले नाही. बाखमुतमध्ये 5 महिन्यांहून अधिक काळ लढा देऊनही, रशियाला पुढे जाण्यात अपयश आले. जॉन किर्बी म्हणाले की, बाखमुतच्या माध्यमातून युक्रेनचा डोनबास ताब्यात घेण्याचा प्रयत्न फसला.
तथापि, किर्बीने युक्रेनियन सैनिकांच्या मृत्यूची आकडेवारी सार्वजनिक करण्यास नकार दिला. युक्रेन रशियाने लादलेल्या युद्धाचा बळी असल्याचे ते म्हणाले.
रशियाने आपल्या सैन्याला थकवले
जॉन किर्बी म्हणाले की, या युद्धावर रशियाने आपली बरीच शस्त्रे खर्च केली आहेत. त्याचे सैनिकही दीर्घकाळ चाललेल्या या युद्धामुळे थकले आहेत. दुसरीकडे, रशियाने सोमवारी युक्रेनवर डागलेले 18 पैकी 15 क्षेपणास्त्र इंटरसेप्ट केले.
इतर 3 क्षेपणास्त्रांमुळे 2 जण ठार, तर 40 जण जखमी झाले. झेलेन्स्की यांनी रात्री उशिरा एक व्हिडिओ जारी करून या हल्ल्यात शाळेत जाणाऱ्या एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.