आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडून मिळालेली मदत विसरणार नाही अमेरिका:कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ज्या प्रकारे भारताकडून मदत मिळाली, अगदी त्याच प्रकारे आता अमेरिकाही कठीण काळात भारताला साथ देईल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जयशंकर यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव यांचीही भेट घेतली

कोरोनाच्या काळात भारताकडून मिळालेल्या मदतीबद्दल अमेरिकेने कृतज्ञता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकेन यांनी शुक्रवारी म्हटले की कोविड-19 च्या सुरुवातीच्या काळात भारताने अमेरिकेला ज्या प्रकारे पाठिंबा दर्शवला होता ते आम्ही कधीही विसरू शकत नाही. आम्हाला आता त्याच प्रकारे भारताला मदत करायची आहे.

अमेरिकेच्या दौर्‍यावर गेलेले भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ब्लिंकन यांनी हे सांगितले. ब्लिंकेन म्हणाले की, सध्याच्या काळातील अनेक महत्त्वाच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी अमेरिका आणि भारत एकत्र काम करत आहेत. कोविड -19 चा सामना करण्यासाठी आपणही एकजूट आहोत. तसेच ते म्हणाले की दोन्ही देशांची भागीदारी मजबूत आहे आणि आम्हाला असे वाटते की त्याचे चांगले निकाल मिळत आहेत.

दुसरीकडे, जयशंकर यांनीही कोरोना लढ्याच्या कठीण परिस्थितीत अमेरिकेकडून मिळालेली मदत आणि एकतेसाठी जो बायडेन प्रशासनाचे आभार मानले आहेत. जयशंकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, दोन्ही देशांमध्ये चर्चेचे अनेक मुद्दे आहेत. गेल्या वर्षी आपले नाते मजबूत झाले आहेत आणि पुढेही असेच राहण्याचा विश्वास आहे.

लस भागीदारीवरही चर्चा झाली
जयशंकर यांनी म्हटले आहे की, ब्लिंकेनसोबतच्या भेटीमध्ये कोरोना लसीवर झालेली चर्चा सर्वात महत्त्वाची राहिली. आम्ही अमेरिकेच्या मदतीने भारतात लसीचे उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. जयशंकर यांनी सोशल मीडियावरही ब्लिंकेनसोबतच्या भेटीची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की, या बैठकीमध्ये इंडो पॅसिफिक, क्वाड, अफगानिस्तान, म्यांमार, UNSC संबंधीत प्रकरणे आणि दुसऱ्या आंतरराष्ट्रीय संस्थांविषयी चर्चा झाली. त्याचबरोबर लसीचा पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी भारत-अमेरिका लस भागीदारीवर भर देण्यात आला.

जयशंकर यांनी अमेरिकेचे संरक्षण सचिव यांचीही भेट घेतली
ब्लिंकेन यांची भेट घेण्यापूर्वी जयशंकर यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जॅक सुलिवान आणि संरक्षण सचिव लॉयड ऑस्टिन यांचीही भेट घेतली होती. ऑस्टिन आणि जयशंकर यांच्यात दीर्घ चर्चा झाली. यावेळी दक्षिण आशिया आणि विशेषतः अफगाणिस्तानच्या मुद्दय़ावर लक्ष केंद्रित केले गेले. भारत आणि प्रशांत महासागरातील चीनच्या वाढत्या कारवायांवरही सविस्तर चर्चा झाली.

बातम्या आणखी आहेत...