आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेचा पुन्हा इशारा:​​​​​​​मोदींना म्हणाले बायडेन -रशियाकडून तेल खरेदी करणे भारताच्या हिताचे नाही, अमेरिकेकडून हवी ती शस्त्रे खरेदी करा

वॉशिंग्टनएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भारत-अमेरिकेतील 2+2 बैठकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यात व्हर्च्युअल बैठक झाली. त्यात बायडेन यांनी मोदींना रशियावरील आर्थिक निर्बंधांची माहिती देत त्याच्याकडून कच्चे तेल व नैसर्गिक वायू खरेदी न करण्याचा पुनरुच्चार केला. रशियाकडून तेलाची खरेदी करणे भारताच्या कोणत्याही दृष्टिकोनातून हिताचे नाही, असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी मोदींपुढे अमेरिकेकडून शस्त्र खरेदी करण्याचा प्रस्तावही ठेवला.

अमेरिकेने रशियाच्या मुद्यावर यापूर्वीच दिला इशारा

अमेरिकेने रशिया-युक्रेन युद्धातील भारताच्या भूमिकेवर यापूर्वीच हरकत नोंदवली आहे. भारताने रशियासोबतचे संबंध एका ठराविक मर्यादेपर्यंत ठेवावेत असे अमेरिकेला वाटते. व्हाईट हाऊसने म्हटले होते -भारत रशियाकडून अवघे 1-2%, तर अमेरिकेकडून 10% तेल आयात करतो. तथापि, जवळपास तासभर चाललेल्या दोन्ही नेत्यांच्या बैठकीत बायडेन यांनी रशिया-युक्रेन युद्धाप्रकरणी भारतावर कोणताही दबाव टाकला नाही.

युक्रेनला केलेल्या मदतीचे स्वागत

बायडेन म्हणाले -भारत-अमेरिकेचे मंत्र्यांचीही भेट होत आहे. कोरोना महामारीच्या काळात आपण आरोग्य व अर्थव्यवस्थेशी संबंधित अनेक आव्हानांचा सामना केला. आपली संरक्षणासह अनेक क्षेत्रांत मजबूत भागीदारी आहे. दोन्ही देश जगासाठी लोकशाहीचे आदर्श उदाहरण आहेत. भारताने युक्रेनला केलेल्या मदतीचे मी स्वागत करतो.

बुचा नरसंहारावर व्यक्त केली चिंता

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले -युक्रेनच्या बुचात सर्वसामान्य नागरिकांचा गेलेला बळी अत्यंत चिंताजनक आहे. भारताने त्याचा निषेध नोंदवून निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे. आम्ही या प्रकरणी यापूर्वीच रशियन अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशी थेट चर्चा करण्याचे आवाहन केले आहे.

बायडेन यांची मोदींना भेटण्याची इच्छा

भारत व अमेरिका दोन मोठे लोकशाही देश आहेत. युक्रेनच्या मुद्यावर दोन्ही देश सातत्याने संवाद साधत आहेत. आमच्यात सामरिक भागीदारीही असल्यामुळे आमच्यातील संबंध आणखी मजबूत होतील, असेही बायडेन यावेळी या आभासी बैठकीत म्हणाले. त्यांनी यावेळी मोदींची क्वाड परिषदेत भेट घेण्याचीही इच्छा व्यक्त केली.

युक्रेन प्रश्नी संयुक्त राष्ट्रात झालेल्या मतदानात भारताने अद्याप कोणत्याही पक्षाविरोधात मतदान केले नाही.
युक्रेन प्रश्नी संयुक्त राष्ट्रात झालेल्या मतदानात भारताने अद्याप कोणत्याही पक्षाविरोधात मतदान केले नाही.

संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने रशियाचे सदस्यत्व रद्द केले आहे. या प्रकरणी झालेल्या मतदानात 93 देशांनी रशियाविरोधात मतदान केले. तर चीनसह 24 देशांनी रशियाची बाजू घेतली. भारताने यातही तटस्थ भूमिका घेतली. असे 58 देशांनी केले. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासूनच भारताने या प्रकरणी तटस्थ भूमिका घेतली आहे.