आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिल्लीतील अमेरिकेच्या 4 महिला राजदूत रिक्षातून जातात ऑफिसला:बुलेटप्रूफ गाडी सोडून विकत घेतली रिक्षा

नवी दिल्ली9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताची राजधानी नवी दिल्लीतील अमेरिकेच्या दुतावासातील 4 महिला अधिकारी रिक्षातून कार्यालयात येता. विशेष म्हणजे या रिक्षा त्यांच्या वैयक्तिक मालकीच्या आहेत आणि यातूनच त्या कार्यालयात जातात.

एन एल मेसन, रूथ होल्म्बर्ग, शरीन जे किटरमॅन आणि जेनिफर बायवॉटर्स यांचे म्हणणे आहे की, रिक्षा चालवणे केवळ मनोरंजक नसून अमेरिकन अधिकारीही सामान्य लोकांप्रमाणेच असल्याचे हे एक उदाहरण आहे.

दिल्लीतील अमेरिकन दुतावासातील चारही महिला अधिकारी. उजवीकडून - रुथ होल्म्बर्ग, जेनिफर बायवॉटर्स, शरीन जे किटरमॅन आणि मेसन(समोर बसलेल्या)
दिल्लीतील अमेरिकन दुतावासातील चारही महिला अधिकारी. उजवीकडून - रुथ होल्म्बर्ग, जेनिफर बायवॉटर्स, शरीन जे किटरमॅन आणि मेसन(समोर बसलेल्या)

रिक्षाला पर्सनल टच दिला, ब्ल्यूटुथ डिव्हाईस लावले

यावर एएनआयशी बोलताना एन एल मेसन म्हणाल्या - मी कधीही क्लचच्या गाड्या चालवल्या नाही. मी नेहमी ऑटोमेटिक कारच चालवते. मात्र भारतात रिक्षा चालवणे हा एक नवा अनुभव होता. मी पाकिस्तानात होते तेव्हा मी मोठ्या बुलेटप्रुफ गाडीतून फिरायचे. त्यातूनच ऑफिसमध्ये जायचे. मात्र जेव्हा मी बाहेर रिक्षा बघायचे तेव्हा वाटायचे की एकदा तरी ही चालवायची आहे. यामुळेच मी भारतात आल्यावर एक रिक्षाच विकत घेतली. माझ्यासोबत रूथ, शरीन आणि जेनिफरनेही रिक्षा विकत घेतली.

मेसन म्हणाल्या - मला आईकडून प्रेरणा मिळाली. ती नेहमी काहीतरी नवे करायची. तिनेच मला नेहमी चान्स घ्यायला शिकवले. माझी मुलगीही रिक्षा चालवायला शिकत आहे. मी रिक्षा पर्सनलाईझ केली आहे. यात ब्ल्युटूथ डिव्हाईसही लावले आहे. यात टायगर प्रिंटचे पडदेही आहेत.

चारही महिला डिप्लोमॅट रिक्षा चालवत इतर महिलांनाही प्रेरित करतात.
चारही महिला डिप्लोमॅट रिक्षा चालवत इतर महिलांनाही प्रेरित करतात.

मेक्सिकन राजदूताकडेही रिक्षा होती

भारतवंशीय अमेरिकन डिप्लोमॅट शरीन जे किटरमॅन यांच्याकडे गुलाबी रंगाची रिक्षा आहे. याच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये अमेरिका आणि भारताचा ध्वज लावलेला आहे. त्यांचा जन्म कर्नाटकमध्ये झाला होता. नंतर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांच्याकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे.

त्या म्हणाल्या - मला मेक्सिकन राजदूत मेल्बा प्रिआंकडून प्रेरणा मिळाली. 10 वर्षांपूर्वी त्यांच्याकडे एक पांढऱ्या रंगाची रिक्षा होती. त्यांचा चालकही होता. जेव्हा मी भारतात आले, तेव्हा बघितले मेसनकडे रिक्षा आहे. नंतर मीही रिक्षा खरेदी केली.

भारतवंशीय अमेरिकन राजदूत शरीन जे किटरमॅन त्यांच्या गुलाबी रंगातील रिक्षातून फिरतात.
भारतवंशीय अमेरिकन राजदूत शरीन जे किटरमॅन त्यांच्या गुलाबी रंगातील रिक्षातून फिरतात.

लोकांना भेटणे हीसुद्धा डिप्लोमसीः रुथ होल्म्बर्ग

अमेरिकेच्या अधिकारी रुथ होल्म्बर्ग म्हणाल्या - मला रिक्षा चालवायला आवडते. मी बाजारातही यातूनच जाते. तिथे लोकांना भेटते. महिला मला बघून प्रोत्साहित होतात. माझ्यासाठी डिप्लोमसी केवळ उच्च स्तरावरच नाही. डिप्लोमसीचा अर्थ आहे लोकांना भेटणे, त्यांना जाणून घेणे आणि त्यांच्यासोबत एक नाते तयार करणे. हे सर्व मी रिक्षा चालवताना करू सकते. माझा दिवस लोकांच्या भेटीने सुरु होतो. डिप्लोमसीसाठी हे गरजेचे आहे.

नव्या गोष्टी शिकणे कठीण नाहीः जेनिफर बायवॉटर्स

रिक्षा चालवण्याचा अनुभव सांगताना जेनिफर म्हणाल्या - मी लोकांतील चांगुलपणा बघितला आहे. अनेकदा लोकांना जाणून घेण्यासाठी तुम्हाला आऊट ऑफ द बॉक्स विचार करावा लागतो. जेव्हा मी दिल्लीत आले तेव्हा मेसनसह रिक्षातून जायचे. नंतर मी स्वतःची रिक्षा घेतली. ती चालवणे कठीण होते पण मी शिकून घेतले.

शिकणे तितके कठीण नसते पण सर्वात जास्त कठीण असते जवळ चालणाऱ्या गाड्यांचा विचार करून रिक्षा ड्राईव्ह करणे. इथे कुणीही कुठूनही अचानकच येतो. कधी कधी हे भयावह असते, पण यात खूप मजा येते.

बातम्या आणखी आहेत...