आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय:मुलांना सुधारण्यासाठी बळाचा वापर गुन्हा नाही’

पवनकुमार | नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘शिक्षकांकडून मुलांना मारण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. हायकोर्टाच्या गोवा पीठाचे न्यायमूर्ती भारत पी. देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पीठाद्वारे स्केलने विद्यार्थ्यास मारहाण प्रकरणात आरोपी शिक्षिका रेखा फलदेसाई यांना दिलासा दिला. हायकोर्ट म्हणाले, विद्यार्थ्यांना सुधारण्याच्या उद्देशाने एखादा शिक्षकाने कठोर शब्दाचा वा बळाचा वापर करणे गुन्हा नाही. तसेच कोर्टाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. कनिष्ठ कोर्टाने शिक्षिकेला एक दिवसाची कैद व १.१० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. गोव्याच्या रेखा यांच्या विरोधात एका विद्यार्थ्याच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

बातम्या आणखी आहेत...