आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमेरिकेच्या फूड अँड ड्रग एडमिनिस्ट्रेशन (USFDA) ने मंगळवारी म्हटले की, त्यांनी पहिल्या सेल्फ कोविड टेस्ट किटला मंजूरी दिली आहे. या किटच्या माध्यमातून घरीच कोरोना टेस्ट केली जाऊ शकते. या माध्यमातून 30 मिनिटांत रिजल्ट मिळतो.
ल्यूकिरा हेल्थने केली निर्मिती
USFDA कडून जारी करण्यात आलेल्या वक्तव्यात म्हटले आहे की, या सिंगल यूज टेस्ट किटची निर्मिती ल्यूकिरा हेल्थने केली आहे. याचा वापर एमरजेंसीमध्ये केला जाऊ शकतो. या किटच्या माध्यमातून स्वतः नाकातून स्वॅब सँपल टेस्ट केली जाऊ शकते. USFDA नुसार, 14 वर्षे किंवा यापेक्षा मोठे लोक या किटच्या माध्यमातून कोरोनाची टेस्ट करु शकतात.
घरीच रिजल्ट देणारी ही पहिली किट
USFDA चे कमिश्नर स्टीफन हान यांनी म्हटले की, आतापर्यंत घरी जाऊन कोविड-19 टेस्टचे सँपल घेण्यासाठी परवानगी होती. याचा रिजल्ट नंतर यायचा. ही पहिली अशी किट आहे, ज्याचा वापर स्वतः केला जाऊ शकतो आणि हे घरीच रिजल्ट देते. USFDA ने म्हटले की, या किटचा वापर रुग्णालयांमध्येही केला जाऊ शकतो. मात्र 14 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींच्या टेस्टसाठी सँपल एखाद्या हेल्थ वर्करनेच घ्यावे.
अमेरिकेत पुढच्या वर्षाच्या जुलैपर्यंत सर्वांना दिली जाणार कोरोना लस
अमेरिकेने आपल्या सर्व नागरिकांच्या लसीकरणाच्या योजनेवर काम करण्यास सुरुवात केली आहे. पुढच्या महिन्यापासून हे अभियान सुरू होईल आणि आशा आहे की, डिसेंबरच्या अखेरपर्यंत जवळपास दोन कोटी लोकांना लस दिली जाऊ शकते. एप्रिलपर्यंत येथे व्हॅक्सीनचे 70 कोटी डोज तयार होतील. या हिशोबाने अमेरिकेच्या सर्व नागरिकांना लस देण्याचे काम एप्रिल ते जुलै या काळात पूर्ण होईल. मॉडर्ना आणि फायजरने जी व्हॅक्सिन तयार केली आहे त्याचे दोन डोज एका व्यक्तीला द्यावे लागतील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.