आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Usha Met For The First Time While Carrying Dirt, Today Her Stubbornness Has Changed The Lives Of Thousands | Marathi News

प्रेरणा:मैला वाहून नेताना उषा पहिल्यांदा भेटली, आज तिच्या जिद्दीने हजारोंचे जीवन बदलले

​​​​​​​पाटणा / डॉ. बिंदेश्वर पाठक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
2021 राष्ट्रपती कोविंद यांनी पद्मश्रीने सन्मानित केले. - Divya Marathi
2021 राष्ट्रपती कोविंद यांनी पद्मश्रीने सन्मानित केले.

२०२१च्या पद्म पुरस्कार वितरण समारंभात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पद्मश्री स्वीकारणाऱ्या उषा चौमडला देशातील फार कमी लोक ओळखतात. बहुतांश लोकांमध्ये त्यांची सुलभ इंटरनॅशनलच्या सामाजिक सेवा संस्थेच्या अध्यक्ष म्हणून ओळख आहे. राजस्थानच्या अलवर येथील उषा चौमड यांनी ही कहाणी यापेक्षा अधिक गौरवाची आहे. सुलभ स्वच्छता, सामाजिक सुधारणा आणि मानवी हक्क आंदोलनाचे संस्थापक पद्मभूषण उषा चौमड यांना डॉ. बिंदेश्वर पाठक १९ वर्षांपासून ओळखतात. ते सांगतात की, नुकतेच राष्ट्रपतींसोबतच्या चर्चेत उषाचा संघर्ष त्यांना ऐकवला. अलवरमध्ये डोक्यावरून मैला वाहण्यापासून राष्ट्रपती भवन व पद्मश्रीपर्यंतचा उषा यांचा प्रवास प्रेरणा व समर्पणाची कथा दर्शवते. त्यांनी स्वत:सोबत हजारो आयुष्ये बदलली.

2003 अलवरमध्ये मैला वाहून नेताना उषा.
2003 अलवरमध्ये मैला वाहून नेताना उषा.

आईने हे काम शिकवले, काम सोडले तेव्हा सासू नाराज झाली... उषाने जिद्द सोडली नाही
२००३ ची घटना आहे. मी राजस्थानच्या अलवरमध्ये होतो. मैला चौकवर काही महिला येताना दिसल्या. सर्व जणी मैला वाहून नेण्याचे काम करतात हे मला माहीत होते. त्यांना म्हणालो, तुम्हा सर्वांशी थोडे बोलायचे आहे. मी अनोळखी असल्याने त्या तयार होईनात. खूप विनंती केल्यानंतर त्या तयार झाल्या. मी विचारले- तुम्ही सर्व हेच काम करता का? प्रश्न ऐकून सर्व जणी एकमेकींच्या तोंडाकडे पाहू लागल्या. यानंतर एकीने उत्तर दिले- सर, हे आमचे काम आहे. उत्तर देणारी उषा चौमड होती. तिचे धाडस पाहून ही व्यक्ती एक दिवस हजारांचे आयुष्य बदलू शकते,असा आभास झाला. उषाचे लग्न १० व्या वर्षीच झाले होते.

लहानपणी तिची आई मैला वाहत होती, तेव्हा तिला काम समजावे यासाठी सोबत नेत होती. मी उषासोबत तिच्या गल्लीत गेलाे. हे काम करून केवळ २००-३०० रु. महिना कमाई होते हे ऐकून मी स्तब्ध झालो. विचारले- पोट कसे भरते? उत्तर मिळाले- ज्या घरी काम करतो तेथील शिळे अन्न दिले जाते. मी त्यांना समजावून सांगितले की, कोणत्याही जातीतील जन्माचा आणि कर्माचा संबंध नाही. निर्णय तुम्हा सर्वांना घ्यावयाचा आहे. मी उपजीविकेचा पर्याय देण्यात मदत करेन. उषा यांनी जेव्हा सासूला काम (मैला वाहण्याचे) सोडण्याबाबत सांगितले तेव्हा तिने खूप विरोध केला. काम सोडल्यावर कुटुंब कसे चालेल? असे सुरुवातीला तिलाही वाटले. मात्र, ती तयार झाली. मी उषासोबत वसाहतीतील महिलांना कारमधून दिल्लीला आणले. सर्व जणी पहिल्यांदाच कारमध्ये बसल्या होत्या. सुलभ कॅम्पसमध्ये सर्वांचे पुष्पहार देऊन स्वागत केले. लोक आम्हालाही माणूस समजतात, असे वाटले. मात्र, एका ब्राह्मण माणसासोबत कसे राहायचे असा संकोच त्यांच्या मनात होता.

2015 पंतप्रधान माेदींच्या हस्ते पुरस्कार.
2015 पंतप्रधान माेदींच्या हस्ते पुरस्कार.

मी यावर त्यांच्या मनाचा अंदाज घेतला, तत्काळ समजावले की सुलभ कॉम्प्लेक्समध्ये सर्व समान आहेत. सोबत काम करतो. दोन दिवसांनंतर सर्व अलवरला परतणार होत्या तेव्हा त्यांना मुलांना काही खरेदी करण्यासाठी थोडे पैसे दिले. घरी गेल्यावर उषाने अापले पूर्वापार चालत आलेले काम सोडले. सुलभकडून उषासारख्या अन्य महिलांसाठी अलवरमध्ये एक व्होकेशनल ट्रेनिंग सेंटर सुरू केले. त्याचे नाव- नई दिशाएं. आज तिथे सर्व पापड, नूडल्स तयार करतात. शिलाई काम करतात. आपली उपजिविका भागवतात. एक दिवस सेंटरमधील महिलांना प्रश्न विचारला की, सुलभची अध्यक्ष तुमच्यापैकी काेण होईल? सर्वांनी उषा चौमडचे नाव घेतले. आज उषा शिकली आहे. ती स्वच्छतेबाबत राष्ट्रव्यापी अभियान चालवते. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना काशीच्या अस्सी घाटावर स्वच्छतेचा पुरस्कार दिला आणि २०२१ मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला.

डॉ. बिंदेश्वर पाठक प्रेरणास्त्रोत : अनुसूचित जातीच्या महिलेला शिवल्यानंतर आजीने शुद्धीकरण केले होते...त्यावेळी अस्पृशांच्या मुक्ततेसाठी आयुष्य समर्पित करेन,असा दृढनिश्चय केला : डॉ. बिंदेश्वर पाठक यांच्या आयुष्याची कहाणी उषा यांच्या संघर्षापेक्षा कमी नाही. १९४३ मध्ये बिहारच्या वैशाली जिल्ह्यातील रामपूर गावातील प्रतिष्ठित ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या पाठक यांनी लहानपणी अनुसूचित जातील महिलेला स्पर्श केला. त्यामुळे आजीच्या आदेशानुसार मुलाला शुद्ध करण्यासाठी गाईचे शेण लावले आणि गोमूत्र प्यावे लागले होते. या घटनेनंतर बिंदेश्वर यांच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले.

दैनिक भास्करच्या विनंतीवर डॉ. पाठक यांनी लिहिली उषा यांची यशोगाथा.

बातम्या आणखी आहेत...