आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Utkal Bang' Missing From National Anthem In School's Textbooks, Latest News And Update

राष्ट्रगीतातून 'उत्कल बंग' गायब:उत्तर प्रदेशातील प्रकार; अधिकारी म्हणतात- प्रिंटिंग मिस्टेक, काँग्रेस म्हणते - बंगालमधील पराभवाचा सूड

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील तब्बल अडीच लाख सरकारी पुस्तकांतील राष्ट्रगीतात ‘उत्कल बंग’हे दोन शब्द नसल्याची संतापजनक घटना उजेडात आली आहे. काँग्रेसने या प्रकरणी भाजपवर टीकेची झोड उठवत आंदोलनाचा इशारा दिला आहे. तर संबंधित अधिकाऱ्यांनी ही प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा करत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.

काँग्रेसचे कौशांबी जिल्हाध्यक्ष अरुण विद्यार्थी म्हणाले, भाजपला बंगालचा पराभव अद्याप सलत आहे. त्यामुळे त्यांनी जाणिवपूर्वक राष्ट्रगीतातून उत्कल व बंग हे दोन शब्द वगळलेत. काँग्रेस या प्रकरणी रस्त्यावर उतरेल. दुसरीकडे, या प्रकरणी वाद वाढल्यानंतर कौशांबीचे बीएसए प्रकाश सिंग यांनी हा प्रिंटिंग मिस्टेक असल्याचा दावा केला.

ते म्हणाले - ''पुस्तक छापताना ही चूक झाली. पुस्तकातील राष्ट्रगीताच्या ओळीत चूक झाली. सामान्यतः अशी चूक प्रिंटिंगची मानली जाते. पण असे राष्ट्रगीताच्या बाबतीत घडल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना त्याची माहिती दिली जाईल. याचा तपासाही केला जाईल. ही राज्य पातळीवरील गोष्ट आहे.''

राज्य सरकारने ही पुस्तके कौशांबीच्या पालिका शाळांसाठी पाठवली आहे. एकट्या कौशांबी जिल्ह्याची गोष्ट केली, तर 1089 पालिका शाळा आहेत. त्यात पहिली ते 8 वीपर्यंतचे 1 लाख 82 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात.

वाटिका नामक पुस्तकात चुकीचे राष्ट्रगीत छापण्यात आले आहे. हे पुस्तक इयत्ता पाचवीचे आहे. या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर राष्ट्रगीत लिहिले आहे. त्यात पंजाब-सिंध-गुजरात-मराठी-द्राविड....नंतर उत्कल बंग शब्द नाही. त्यानंतर 5वी ओळ थेट विंध्य-हिमाचल-यमुना-गंगा या शब्दांनी सुरू होते. ही चूक पाचवीच्या एक-दोन नव्हे तर सर्वच पुस्तकांत झाली आहे. त्यामुळे प्रकरण गंभीर आहे.

राष्ट्रगीताच्या ओळी अर्धवट आहेत. त्यात उत्कल बंग शब्दच छापण्यात आला नाही.
राष्ट्रगीताच्या ओळी अर्धवट आहेत. त्यात उत्कल बंग शब्दच छापण्यात आला नाही.

6 शाळांची पडताळणी

परिषदीय शाळा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना वाटिका या हिंदी पुस्तकाचे वितरण केले गेले. पुस्तकाच्या मागील पानावर छापण्यात आलेल्या राष्ट्रगीतात चूक निदर्शनास आली. त्यात उत्कल व बंग प्रांताचा उल्लेख नाही. दिव्य मराठीने या प्रकरणी 6 शाळांच्या शिक्षकांशी चर्चा केली. त्यात शिक्षकांनी पुस्तक छापण्यात ही चूक झाली असेल, असा अंदाज व्यक्त केला. पण त्याचवेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी पुस्तक छापण्यावेळी त्यावर लक्ष दिले असते तर बरे झाले असते अशी पुस्तीही जोडली.

विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आलेल्या पुस्तकांत राष्ट्रगीत चुकीचे छापले गेले आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष गेले नाही.
विद्यार्थ्यांना मोफत देण्यात आलेल्या पुस्तकांत राष्ट्रगीत चुकीचे छापले गेले आहे. चिंतेची गोष्ट म्हणजे अधिकाऱ्यांचेही याकडे लक्ष गेले नाही.

आतापर्यंत राज्यातील 4 शाळांत झाला खुलासा

प्राथमिक शाळा, हिसामपूर परसखीमध्येही राष्ट्रगीतातूनही उत्कल व बंग शब्द गायब असणारी पुस्तके वितरित करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्याला आता ही गोष्ट समजल्याचे सांगितले.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण विद्यार्थी.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरुण विद्यार्थी.

प्रमोद प्रिंटरने छापले मुखपृष्ठ

इयत्ता 5 वी हिंदीचे वाटिका नावाचे हे पुस्तक मथुरा येथील प्रमोद प्रिंटरने प्रकाशित केले आहे. त्याची तपशील पुस्तकात आहे. दिव्य मराठीच्या टीमने या प्रिंटिंग प्रेसचा शोध घेतला असता ते मथुरेच्या मसानी भागात असलेल्या मोक्षधामजवळ सापडले. या प्रेसचे मालक प्रमोद गुप्ता यांनी सांगितले की, त्यांनी फक्त त्याचे कव्हर पेज प्रकाशित केले आहे.

मुलांना शाळेत पुस्तके मिळाली. त्यांनी ती वाचण्यासही सुरुवात केली. त्यात एवढी मोठी चूक आढळून आली.
मुलांना शाळेत पुस्तके मिळाली. त्यांनी ती वाचण्यासही सुरुवात केली. त्यात एवढी मोठी चूक आढळून आली.

प्रिंटरचा दावा -आम्हाला शिक्षण विभागाने ऑर्डर दिली नाही

प्रमोद प्रिंटर्सचे मालक प्रमोद गुप्ता यांनी सांगितले की, त्यांनी हे संपूर्ण पुस्तक छापले नाही. केवळ मुखपृष्ठ छापले आहे. हे काम त्यांना शिक्षण विभागाने नव्हे तर मथुरेच्या हाय-टेक प्रिंटरने दिले. त्यानंतर तेथून प्लेट आली, जी आम्ही छापली.

दरम्यान, दिव्य मराठीने हायटेक प्रिंटरला भेट दिली. पण, प्रिंटरचे मालक राम प्रकाश यांची भेट होऊ शकले नाही. त्यांनी आमच्या फोनलाही प्रतिसाद दिला नाही.

बातम्या आणखी आहेत...