आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेश आग्रा जिल्ह्यात गुरुवारी पहाटे भीषण अपघात झाला. एत्माद्दौला परिसरात डिव्हायडरवरुन दुसऱ्या लेनमध्ये पोहोचलेल्या स्कॉर्पियो एसयूव्हीने समोरुन येत असलेल्या कंटेनरला धडक दिली. या अपघातात एसयूव्हीमध्ये असलेल्या आठ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. चार लोकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. स्कॉर्पियोचा रजिस्ट्रेशन नंबर झारखंडचा आहे.
कंटेनर ड्रायव्हरने अपघात टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला
माहितीनुसार हायवेवर हा अपघात पहाटे 5.15 वाजता झाला. एत्मादपुरकडून येत असलेली एसयूव्ही नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवर गेली आणि राँग साइडला गेली. कंटेनर ड्रायव्हरने गाडी वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र वेग जास्त असल्यामुळे तो अपयशी झाला. या अपघातानंतर कंटेनर ड्रायव्हर आणि क्लीनर फरार झाले आहेत.
एसयूव्ही कापून मृतदेह काढले
हा अपघात एवढा भीषण होता की, यामध्ये एसयूव्हीचा चुराडा झाला आहे. गाडीची बॉडी कापून जवळपास एक तासाच्या प्रयत्नांनंतर मृतदेह आणइ जखमींना बाहेर काढण्यात आले. स्थानिक लोकांच्या मदतीने पोलिसांनी बचावकार्य केले आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.