आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Assembly Election 2022; Priyanka Gandhi Announcement | 40% Tickets To Women In UP Vidhan Sabha Chunav

UP निवडणुकीत 40% तिकिट महिलांना:प्रियंका गांधींची मोठी घोषणा, 403 जागांमधून 161 वर महिलांना तिकिट देणार काँग्रेस

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रियंकांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा प्रश्न टाळला

उत्तर प्रदेशातील पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस महिलांना 40% तिकिटे देणार आहे. पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मंगळवारी लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली. प्रियंका म्हणाल्या की हा निर्णय सर्व पीडित महिलांना न्याय देईल. प्रियांकाने 'लडकी हू लढ सकती हूं' असा नवा नारा दिला.

40% महिलांना तिकीट देण्यासाठी, काँग्रेस उत्तर प्रदेशातील एकूण 403 विधानसभा जागांपैकी 161 मध्ये महिला उमेदवार उभे करेल. जेव्हा प्रियंका ही घोषणा करत होत्या, तेव्हा त्यांच्या मंचावर 7 पुरुष उपस्थित होते आणि फक्त दोन महिला शेजारी बसल्या होत्या. यावरून असा अंदाज बांधता येतो की, महिलांना तिकीट देण्याचा पक्षाचा निर्णय खूप आव्हानात्मक असणार आहे.

प्रियंका यांना घराणेशाहीवर हरकत नाही
काँग्रेसने महिलांना 40% तिकिटे देण्याची घोषणा केली असेल, परंतु नेत्यांच्या कुटुंबातील महिलांचेही वर्चस्व असण्याची शक्यता आहे. प्रियंका गांधी यांनी स्वतः पत्रकार परिषदेत घराणेशाहीचे समर्थन केले. जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला की कॉंग्रेसने 40% महिलांना तिकीट देण्याची घोषणा केली आहे, परंतु सर्व प्रभावी नेते फक्त त्यांच्या कुटुंबातील महिलांना तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग करतील. यावर प्रियंका म्हणाल्या की यात काही नुकसान नाही.

प्रियंकांनी स्वतः निवडणूक लढवण्याचा प्रश्न टाळला
प्रियंका म्हणाल्या की आम्ही अर्ज मागवले आहेत आणि 15 नोव्हेंबरपर्यंत लोक तिकिटांसाठी अर्ज करू शकतात. गुणवत्तेच्या आधारे महिलांना तिकिटे दिली जातील. प्रियांका म्हणाल्या की जर त्यांच्या हाता असते तर त्यांनी 40 ऐवजी 50 टक्के तिकिटे महिलांना दिली असती. जेव्हा त्यांना विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा त्यांनी सांगितले की, त्याबद्दल नंतर विचार करू. त्याचवेळी, यूपीमध्ये काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचा चेहरा घेून निवडणुकीत उतरणार का प्रश्नावर त्यांनी सांगितले की, अद्याप यावर निर्णय झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...