आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Auraiya Accident | A Cup Of Tea Saved The Lives Of More Than 24 Labor

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरैया अपघात:एक कप चहामुळे 24 पेक्षा अधिक मजुरांचा जीव वाचला, तर काहींना मृत्यूने झोपेतच गाठले

औरैयाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी सकाळी उत्तर प्रदेशमधील औरैया येथे झालेल्या अपघातात 24 मजुर ठार झाले
  • प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार अनेक मजुर ट्रक थांबून चहा पित असताना ही घटना घडली

उत्तर प्रदेशात जाणाऱ्या मजुरांचे अपघात होत आहेत. कुठे रेल्वे रुळावर मृत्युमुखी पडत आहेत तर कुठे बस किंवा ट्रकच्या धडकेत आपला जीव गमावत आहेत. मुजफ्फरनगर येथे बुधवारी रात्री घडलेल्या अपघातानंतर आता औरैया येथील अपघात याची साक्ष देत आहे. औरैया येथे आणखी 24 मजुरांचा अपघातात मृत्यू झाला असता जर ते चहा पिण्यासाठी थांबले नसते, असे म्हटले जात आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्लीहून आलेल्या मिनी ट्रकमधील काही लोक ढाब्यावर चहा पिण्यासाठी थांबले होते, तेवढ्यात राजस्थानकडून आलेल्या ट्रकने धडक दिली. जे बाहेर थांबले, ते वाचले. उर्वरित दोन्ही वाहनांमधील 24 जणांनी आपला जीव गमावला, तर 35 लोक जखमी झाले.

मिनीट्रकमधील कामगार बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमधील होते .बराच प्रवास केल्यानंतर ते औरैयाजवळील चिरूहली परिसरातील एका ढाब्यावर पोहोचले. संपूर्ण रात्र मिनीट्रकमध्ये घालवल्यानंतर सकाळ होणार होती. परंतु, यास कामगारांचे दुर्दैव म्हणा किंवा कालचक्र की ते सकाळचा सूर्य पाहू शकले नाही. 

अपघातानंतर मोठ्या संख्येने पोलिस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रूग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले.
अपघातानंतर मोठ्या संख्येने पोलिस मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रूग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविण्यात आले.

पहाट होण्यापूर्वी चहा पिण्यासाठी थांबले होते कामगार 

सकाळ होण्यापूर्वी मजुरांना चहा पिण्याची इच्छा जाली आणि याच चहाने त्यांचे जीवन वाचवले. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी बहुतेक कामगार धडक देणाऱ्या ट्रकमध्ये होते. या ट्रकमध्ये 30 कामगार होते. यामध्ये चुन्याची पोती होती. अनेक कामगारांना मृत्यूने झोपेतच गाठले. घटनेनंतर समोर आलेल्या चित्रात मजुरांच्या सामानाचा ढीग देखील दिसतो. राजस्थानहून येणाऱ्या ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर दोन्ही ट्रक पलटी झाले. 

बातम्या आणखी आहेत...