आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Balliya Latest Updates; Dead Body Cremated Using Tires And Petrol, Video Goes Viral; News And Live Updates

यूपीत असंवेदनशीलतेचा कळस:गंगेत वाहणारे मृतदेह पोलिसांनी काढले बाहेर, नंतर पेट्रोल व टायर टाकून जाळले; व्हिडिओ व्हायरल होताच 5 पोलिस अधिकार्‍यांना केले निलंबित

बलिया4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई

देशात गेल्या काही दिवसांपासून गंगा नदीत मृतदेह वाहून येण्याचे प्रमाण वाढतच आहे. उत्तर प्रदेश सरकारने नदीमध्ये मृतदेह दफन करण्यावर बंदी घातली होती. त्यासोबतच संबंधित भागात पोलिसांचा बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला होता. सरकारने कडक निर्देश जारी केल्यावरही मृतदेह वाहून येण्याचे प्रमाण कमी होत नाहीये. शासन प्रशासन या मृतदेहांची योग्य विल्हेवाट लावण्यावरुन काळजीत पडले आहे.

अशातच उत्तर प्रदेशातील बलियामधून एक असंवेदनशील आणि लाजीरवाणा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये काही पोलिस अधिकारी गंगा नदीतील वाहत येणार मृतदेह बाहेर काढत आहे. त्यानंतर मृतदेहांवर पेट्रोल आणि टायर टाकत जाळत आहे. दरम्यान, यामध्ये काही लोकांसोबत पोलिस अधिकारीही दिसतात.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यावर कारवाई
माहितीनुसार, हा व्हिडिओ बलियातील माल्देपूरचा आहे. ज्यामध्ये काही पोलिस कर्मचारी मृतदेह हे लाकडासह पेट्रोल आणि टायर टाकून जाळत आहे. काही वेळातच या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. त्यानंतर संबंधित प्रकरणात 5 पोलिस अधिकार्‍यांना असंवेदनशीलतेच्या आरोपाखाली निलंबित करण्यात आल्याची माहिती पोलिस अधिक्षक विपिन टाडा यानी दिली.

बातम्या आणखी आहेत...