आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh BF GF Kills Callgirl Updates, Burns Face With Acid To Prove GF Dead,

स्वत:ला मृत सिद्ध करण्यासाठी कॉलगर्लची हत्या:स्वत:चे कपडे घातले, चेहरा अ‍ॅसिडने जाळला... कटात प्रियकराची साथ

गौतमबुद्ध नगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील गौतम बुद्ध नगरमध्ये एका मुलीने आत्महत्या केली, ‘मी माझ्या इच्छेने मरत आहे’ अशी सुसाइड नोटही लिहून ठेवली आहे. 13 नोव्हेंबर रोजी सकाळी मुलीच्या कुटुंबीयांनी घरात जळालेल्या चेहऱ्यासह मृतदेह पाहिला. मुलगी मेली असे समजून त्यांनी पोलिसांना न कळवता अंत्यसंस्कार उरकले.

जिच्या नावाने अंत्यसंस्कार करण्यात आले ती मुलगी मेलेली नव्हती. तिने प्रियकरासह मिळून कॉलगर्लची हत्या करून पळ काढला. मृत तरुणीच्या भावाने पोलिसांत बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केल्याने हा खून उघडकीस आला.

प्रियकराशी लग्न करायचे होते, कुटुंबासमोर आत्महत्येचे नाटक केले

आरोपी पायल आणि अजयने फिल्मीस्टाइलमध्ये खून केला. आधी दोघांनी कॉल गर्लचा गळा चिरला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी पायलने मृतदेहाला स्वत:चे कपडे घातले. एवढेच नाही तर स्वत:ला मृत सिद्ध करता यावे म्हणून त्याचा चेहरा अॅसिडने जाळला.

बिसरख पोलिसांनी आरोपी तरुणी पायलचा नंबर ट्रेस केला. त्यामुळे ते प्रियकर अजयपर्यंत पोहोचले. कडक चौकशीत अजयने संपूर्ण सत्य बाहेर काढले. पायलला अजयसोबत लग्न करायचे होते, असे पोलिसांनी सांगितले. कुटुंबीयांनी त्याला रोखले, म्हणून तिने स्वतःला मृत दर्शवण्याचा कट रचला. कुटुंब तिला मृत समजेल आणि ती तिच्या प्रियकरासह आरामात राहू शकेल, असे तिला वाटले. या हत्येप्रकरणी पोलिसांनी अजय ठाकूर आणि पायलला ताब्यात घेतले आहे.

हा फोटो आहे त्या मुलीचा जिला पोलीस कॉलगर्ल म्हणत आहेत. 12 नोव्हेंबरला पायलच्या घरात याच मुलीचा खून झाला होता.
हा फोटो आहे त्या मुलीचा जिला पोलीस कॉलगर्ल म्हणत आहेत. 12 नोव्हेंबरला पायलच्या घरात याच मुलीचा खून झाला होता.

प्रियकराला म्हणाली होती- माझ्यासारखी दिसणारी मुलगी आण

दादरीच्या बधपुरा गावातील पायलने फेसबुकच्या माध्यमातून अजय ठाकूरशी मैत्री केली. ज्याचे रूपांतर काही दिवसांनी प्रेमात झाले. दोघांनी घरातून पळून जाण्याचा बेत आखला. पायलने अजयला एक मुलगी आणायला सांगितली, जिची उंची तिच्यासारखी असायला हवी होती.

अजय कॉल गर्ल खुशी (नाव बदलले आहे) हिला कॉल करतो. तो तिला आधीच ओळखत असतो. 12 नोव्हेंबरच्या रात्री अजय खुशीसोबत पायलच्या घरी पोहोचला. येथे दोघांनी मिळून खुशीचा गळा चिरला. त्यानंतर पायलने खुशीला तिचे कपडे घातले. सुसाइड नोटही सोडली. तिची ओळख उघड होऊ नये म्हणून खुशीचा चेहरा अॅसिडने जाळून टाकला. त्यानंतर दोघेही पळून गेले.

पायलने ओळख लपवण्यासाठी प्रियकरासह मिळून खुशीची हत्या केल्याचा आरोप आहे.
पायलने ओळख लपवण्यासाठी प्रियकरासह मिळून खुशीची हत्या केल्याचा आरोप आहे.

पायलच्या आई-वडिलांनी वर्षभरापूर्वी केली होती आत्महत्या

पायलच्या आई-वडिलांनी वर्षभरापूर्वी विष प्राशन करून आत्महत्या केली होती. पायल तिच्या दोन भावांसोबत बधपुरा गावात राहत होती. फेसबुकवर मैत्री झाल्यानंतर अजय पायलच्या घरी जाऊ लागला. अजयला भेटण्यासाठी पायल तिच्या भावांच्या जेवणात अंमली पदार्थ मिसळत असे, त्यामुळे त्यांना घरात येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांचे भानही नसायचे.

हे छायाचित्र त्या भावाचे आहे ज्याने आपली बहीण हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाणे गाठले.
हे छायाचित्र त्या भावाचे आहे ज्याने आपली बहीण हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची माहिती मिळताच त्याने पोलीस ठाणे गाठले.

मृत तरुणीचा भाऊ म्हणाला- ती माझीच बहीण होती, यावर विश्वास कसा ठेवावा

या प्रकरणाची माहिती मिळताच मृत खुशीच्या भावाने पोलीस ठाणे गाठले. तो म्हणाला, “माझी बहीण 12 नोव्हेंबरला ड्यूटी करून निघाली पण ती घरी पोहोचली नाही, मी तिच्या सहकर्मचाऱ्यांशी बोललो पण काहीही माहिती मिळाली नाही. दोन दिवस उलटल्यानंतर मी पोलिसांत हरवल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी कॉल डिटेल्स काढून तपास सुरू केला. पोलिसांना अजय ठाकूरचा नंबर मिळाला. जो त्या दिवसापासून गावातून बेपत्ता होता. पोलिसांनी अजयचे कॉल डिटेल्स काढून मोबाइल लोकेशन ट्रेस केले. पोलिसांनी त्याला गौर शहरातून ताब्यात घेतले.

पायलच्या घरात एका मुलीची चाकूने वार करून हत्या झाली, तिच्यावर अ‍ॅसिड टाकण्यात आले, तेव्हा तिच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या कशी मानली. स्वत:चा गळा चिरून, स्वत:वर अ‍ॅसिड ओतून कोणी आत्महत्या कशी करू शकते? याप्रकरणी तिच्या भावांनी पोलिसांत तक्रार का केली नाही. ती माझी बहीण होती यावर माझा विश्वास कसा बसेल, मी 20 दिवसांपूर्वी खुशी हरवल्याची तक्रार दाखल केली होती."

बातम्या आणखी आहेत...