आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Big Breaking News Updates। 12 May 2022 Today Live News Updates Agra Lucknow Kanpur Varanasi Prayagraj Meerut

यमुना एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात:बोलेरोची डंपरला धडक, पुण्यातील 5 जणांचा मृत्यू; ड्रायव्हरला डुलकी लागताच काळाचा घाला

ग्रेटर नोएडा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्रेटर नोएडा येथील यमुना एक्सप्रेस वेवर गुरुवारी सकाळी भीषण रस्ते अपघात झाला. येथे भरधाव वेगात असलेली बुलेरो मागून एका डंपरमध्ये घुसली. या अपघातात चार महिलांसह 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. पहाटे पाचच्या सुमारास जेवर परिसरात हा अपघात झाला. धडक इतकी जोरदार होती की बोलेरोच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले.

मथुरेहून बोलेरोमधून ग्रेटर नोएडाच्या दिशेने 7 लोक येत होते. यमुना द्रुतगती मार्गावरील जेवर टोल प्लाझासमोर पहाटे 5 वाजताच्या सुमारास बोलेरोची मागून 40 किमी अंतरावरील डंपरला धडक बसली. ग्रेटर नोएडाचे अतिरिक्त डीसीपी विशाल पांडे म्हणाले, 'ड्रायव्हरला झोप लागल्याने बोलेरो डंपरमध्ये घुसली असण्याची शक्यता आहे. मृत हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. प्रवासी हे बारामतीचे असल्याची माहिती आहे.

डंपर पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलिस आरोपी चालकाचा शोध घेत आहेत. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कटरने वाहन कापून जखमींना बाहेर काढले. चंद्रकांत नारायण बुराडे (वय 68), स्वर्णा चंद्रकांत बुराडे (वय 59), मालन विश्वनाथ कुंभार (वय 68), रंजना भरत पनवार (वय 60 वर्षे), नुवांजन मुजावर (53 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत.

नारायण रामचंद्र कोळेकर आणि सुनीता राजू गेस्ते जखमी झाले असून त्यांच्यावर जेवर येथील कैलास रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चालकाला डुलकी लागल्याने बुलेरो कार डंपरला धडकल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. जखमींवर उपचार करण्याच्या सूचना त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

अजित पवारांनी व्यक्त केला शोक

बातम्या आणखी आहेत...