• Home
  • National
  • Uttar Pradesh Chief Minister Yagi Adityanath has been threatened with a bomb

लखनऊ / उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांना बाॅम्बने उडवण्याची धमकी

  • या प्रकरणाची चाैकशी एसटीएफवर साेपवण्यात आली आहे

वृत्तसंस्था

May 23,2020 07:21:00 AM IST

लखनऊ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री याेगी आदित्यनाथ यांना व्हाॅट‌्सअॅपवर जिवे मारण्याची धमकी देणारा संदेश आला. ‘मुख्यमंत्री याेगी यांना मी बाॅम्बने मारणार आहे,’ असे सांगून याेगी हे अनेक लाेकांच्या जिवांचे शत्रू असल्याचे त्याने या संदेशात म्हटले आहे. हा धमकीचा संदेश ८८२८४५३३५० या क्रमांकावरून गुरुवारी रात्री १२.३२ वाजता उत्तर प्रदेश ११२ हेल्पडेस्कच्या ७५७०००१०० या व्हाॅट‌्सअॅप क्रमांकावर पाठवण्यात आला.

पाेलिस या माेबाइल क्रमांकाचा शाेध घेत आहेत. गाेमतीनगर पाेलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक धीरजकुमार यांनी विराेधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची चाैकशी एसटीएफवर साेपवण्यात आली आहे. आराेपीच्या संदर्भात पाेलिसांना अनेक माहिती मिळाली आहे.

X