आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Corona Virus Outbreak Updates: The Body Of A Coronary Patient Was Thrown Into The River; News And Live Update

उत्तर प्रदेशातील धक्कादायक घटना:कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला; गंगेच्या किनारी मृतदेह सापडल्यानंतरचे आणखी एक लाजिरवाणे छायाचित्र

लखनऊ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोतवालीनगरमध्ये महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गंगेच्या किनारी मृतदेह सापडल्यानंतर उत्तर प्रदेशातील अाणखी एक लाजिरवाणे छायाचित्र समाेर अाले अाहे. बलरामपूरमध्ये काराेनाबाधित रुग्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याएेवजी कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह नदीत फेकून दिला. या घटनेचा एक व्हिडिअाेही व्हायरल झाला अाहे. यामध्ये पीपीई किट घालून दाेन व्यक्ती मृतदेह पुलावरून पाण्यात फेकताना दिसत अाहेत. ही घटना काेतवाली ठाण्याच्या भागातील सिसई घाट पुलावरील अाहे. पाेलिसांनी दाेन अाराेपींच्या विराेधात गुन्हा दाखल केला अाहे.

मृतदेह फेकणाऱ्या दाेन्ही व्यक्तींची अाेळख पटली असून ते मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य अाहेत. यातील एक अाराेग्य कर्मचारी अाहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय बहादुर सिंह म्हणाले की, राप्ती नदीत फेकलेला मृतदेह सिद्धार्थनगर जिल्ह्यातील शोहरतगड येथील रहिवासी प्रेमनाथ मिश्रा यांचा आहे. कोरोना संसर्ग झाल्याने २५ मे रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२८ मे रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. नंतर काेराेना नियमावलीनुसार मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात अाला. नदीत मृतदेह फेकल्याची घटना उघडकीस आल्यानंतर कोतवालीनगरमध्ये महामारी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...