आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Coronavirus News; Minister Hanuman Swaroop Mishra Dies Of Covid At Lucknow SGPGI Hospital

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यूपीच्या 5 शहरांमध्ये लावले जाणार नाही लॉकडाऊन:हायकोर्टाच्या आदेशावर सुप्रीम कोर्टाची स्थगिती; योगी सरकार आता संपूर्ण राज्यात लावणार वीकेंड लॉकडाऊन

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्तरप्रदेशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे.

लखनऊसह उत्तर प्रदेशातील 5 शहरांमध्ये लॉकडाऊन लादला जाणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सोमवारी, हायकोर्टाने लखनऊ, कानपूर, वाराणसी, प्रयागराज आणि गोरखपूरमध्ये 26 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊनचे आदेश दिले होते. याविरोधात योगी सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यूपी सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठासमोर ठेवले. सरकारने म्हटले आहे की, लॉकडाऊनचा आदेश देणे न्यायपालिकेच्या कार्यक्षेत्रात येत नाही.

दरम्यान, पुन्हा एकदा योगी सरकारने संपूर्ण राज्यात वीकली लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच आता प्रत्येक शनिवार आणि रविवारी राज्यात सर्व काही बंद राहिल. केवळ इमरजेंसी सुविधाच सुरू राहतील. आतापर्यंत केवळ रविवारीच लॉकडाऊन होते. या व्यतिरिक्त ज्या जिल्ह्यांमध्ये 500 पेक्षा जास्त अॅक्टिव्ह केस आहेत. तिथे रोज रात्री 8 वाजेपासून दुसऱ्या दिवशी सकाळी 07 वाजेपर्यंत आवश्यक सेवा वगळता सर्व गोष्टींवर निर्बंध असतील.

उत्तरप्रदेशात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणाबाहेर जात असल्याचे दिसत आहे. रोज नवीन संक्रमितांसह मृतांचा आकडाही वाढतना दिसत आहे. सोमवारी राज्यात 28,211 नवीन संक्रमितांची ओळख झाली आणि 167 लोकांचा मृत्यू झाला आहे.

तर, मंगळवारी सकाळी उत्तर प्रदेश कोऑपरेटिव्ह यूनियनचे अध्यक्ष हनुमान मिश्र (राज्यमंत्री दर्जा प्राप्त) यांचे लखनऊच्या PGI मध्ये निधन झाले. ते कोरोना पॉझिटिव्ह होते. असे सांगितले जात आहे की, उपचारांदरम्यान त्यांची किडनी फेल झाली होती. खरेतर PGI ने अजून आपले अधिकृत वक्तव्य जारी केलेले नाही. हनुमान मिश्र कानपुर-बुंदेलखंड क्षेत्राचे महामंत्री, विद्यार्थी परिषदेचे प्रदेश मंत्री राहिले आहेत.

बातम्या आणखी आहेत...