आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Coronavirus Transmission Update; Ganga River News | Bodies Found Floating In Unnao Ganga Ghat; News And Live Updates

कोरोनाकाळातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीतून रिपोर्ट:पावसात नदीची पाणी पातळी वाढल्याने समोर आले रेतीत दफन केलेल्या मृतदेहांचे सत्य; सीमेच्या वादात अडकले 500 मृतदेह

उन्नावएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • फतेहपूरच्या एसडीएम प्रियंका यांचे म्हणणे की, हे प्रकरण उन्नावाचा आहे.

माझा जन्म गंगेच्या काठी झाला असून मी येथेच लहानाचा मोठा झालो आहे. परंतु, मी माझ्या आयुष्यात आतापर्यंत असे विदारक दृष्य बघितले नाही. मी सध्या उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील गंगा नदीच्या घाटावर आहे. जेथे एकाचवेळी 500 मृतदेहांना दफन करण्यात आले आहे. ते मृतदेह हिन्दूंचे असोत की मुस्लीमांचे... काही फरक पडत नाही, कारण ते शेवटी मानवच आहेत. वाचा भास्कर रिपोर्टर दिलीप सिंह यांचा LIVE रिपोर्ट...

सकाळचे दृष्य हृदय हेलावणारे होते
कोरोनाकाळातील सर्वात मोठी स्मशानभूमी याला सोडून दुसरीकडे कुठे असेल मला वाटत नाही. कारण मी कालपासून याचा भागाचा निरिक्षण करीत आहे. काल जे दृष्य होते त्यापेक्षाही भयानक दृष्य आज पाहायला मिळाले. आम्ही कानपुरपासून 70 किलोमीटरचा प्रवास करत या घाटावर पोहोचलो. रात्रीच्या पावसामुळे गंगा नदीच्या पातळीत वाढ झाल्याने 500 मृतदेह बाहेर आले. दरम्यान, त्या मृतदेहांवर एक-दोन नाहीतर तब्बल 50 पेक्षा जास्त कुत्रे तुटून पडले होते.

जिकडे तिकडे फक्त मृतदेहच दिसत होते. या घटनेची माहिती संबंधित अधिकार्‍यांना मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले. काही कळायच्या आतच त्यांनी आणि त्या रुग्णांवरील कपडा काढून त्यांना वाळूत पुरले. कारण माध्यमकर्मींना हे मृतदेह मोजता यायला नको. विशेष म्हणजे सर्व माध्यमकर्मी आणि इतर लोकांना येथे जाण्यापासून रोखण्यात आलेले होते.

डोळ्यासमोर खोटे बोलत होते SDM
मृतदेहांचे सत्य दफन करण्यासाठी आलेल्या SDM चे धैर्य तर पाहा... एकीकडे मृतदेह वाळूत पुरत होते तर दुसरीकडे हे महाशय माध्यम प्रतिनिधी खोटी बातमी पसरवत असल्याचे सांगत होते. यांचे नाव दयाशंकर पाठक असून यांना ज्यावेळी माध्यम प्रतिनिधींनी याबाबतीत प्रश्न उपस्थित केला त्यावेळी येथे कुठलीचे मृतदेह नसल्याचे सांगितले. या सर्व परिस्थितीत कुत्रे मृतदेहांवर तुटून पडले आणि हे साहेब सर्वांसमोर सत्य दपडण्याचा प्रयत्न करत होते.

आता 2 जिल्ह्यांत सीमेवरुन वाद
हे मृतदेह कोणाचे? कोणी याला दफन केले? यांचे मृत्यू कसे झाले? हे अधिकारी वर्गाला जाणून घेण्यात रस वाटत नाही. कारण त्यांना फक्त हा कोणत्या जिल्ह्यांत येतो हे महत्वाचे वाटत आहे. प्रत्येकाला वाटत आहे हे प्रकरण आपल्या क्षेत्रात यायला नको. कारण यामुळे त्यांना आपले अपशय झाकता येणार आहे. अशावेळी आता खरी लढाई फतेहपूर आणि उन्नावमध्ये सीमा वादावरुन आहे.

फतेहपूरच्या एसडीएम प्रियंका यांचे म्हणणे की, हे प्रकरण उन्नावाचा आहे. तर उन्नावचे एसडीएम महाशयांनी आधीच येथे कुठलेच मृतदेह नसल्याचे सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...