आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh । Crime। In Shahjahanpur, Uttar Pradesh, A Lawyer Was Shot Dead After Entering The Court

धक्कादायक:उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुरमध्ये न्यायालयात घुसून वकिलाची हत्या, गोळी झाडल्यानंतर आरोपी फरार; घटनास्थळी मोठा फौजफाटा तैनात

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशात भरदिवसा न्यायालयात आत घुसून वकिलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भूपेंद्र प्रताप सिंह असे मृत वकिलाचे नाव आहे. न्यायालय इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांची हत्या करण्यात आली आहे. वकिल भूपेंद्र सिंह कामानिमित्त न्यायालयाच्या तिसऱ्या मजल्यावरील रेकॉर्ड रुममध्ये गेले असता, त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली.

त्या घटनेनंतर गोळी मारणारा आरोपी पसार झाला आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. न्यायालयाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून, तेथील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही तपासत असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

बातम्या आणखी आहेत...