आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापिलीभीतमध्ये अनम नामक एका 10 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली. 3 डिसेंबर ही कोवळी मुलगी जखमी अवस्थेत शेतात आढळली. तिच्या पोटात चाकूचा खोलवर घाव होता. तिची आतडी बाहेर पडली होती. चेहरा व हातावरही गंभीर जखमा होत्या. जवळपास अर्धातास त्रास सहन केल्यानंतर तिचा तडफडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पीडित कुटुंबाने आपल्याच शकील नामक नातलगावर संशय व्यक्त केला. पण पोलिस चौकशीत वेगळेच सत्य उजेडात आले.
सूड उगवण्यासाठी स्वतःचीच कोवळी कळी खुडली
पोलिस चौकशीत अनमचे वडील अनीस, काका शादाब व आजोबा शहजादे यांनी सूड उगवण्यासाठी हा खून केल्याचे निष्पन्न झाले. अनीसने आपला भाऊ शादाबला बलात्काराच्या आरोपातून वाचवण्यासाठी आपल्याच निष्पाप मुलीचा बळी घेतला. पोलिसांनी 3 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी सोमवारी 5 आरोपींना अटक केली आहे. या आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला आहे. ही घटना पिलीभीतच्या अमरिया पोलिस ठाणे हद्दीतील माधोपूर गावात घडली.
प्रथम वाचा मुलीच्या हत्येचे कारण
वर्ष 2019, मृत अनमचे काका शादाबचे गावाजवळ राहणाऱ्या एका मुलीवर प्रेम जडते. गोष्ट लग्नापर्यंत पोहोचली. पण मुलीचे कुटुंब तयार झाले नाही. खूप विनवणी केल्यानंतरही कुटुंब तयार झाले नसल्यामुळे शादाबने त्या मुलीशी पळून जाऊन लग्न केले. मुलगी पारशी समाजाची होती. त्यामुळे मुलीच्या भाऊ शकीलने लग्नाला विरोध केला. यामुळे दोन्ही कुटुंबांत शत्रूत्व निर्माण झाले. यादरम्यान शकीलच्या पत्नीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात शादाबविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी न्यायालयाने नुकताच वॉरंटही जारी केला. यामुळे कुटुंबाला शादाबला वाचवण्यासाठी चिंतेत पडले होते. काका शादाब व आजोबा शहजादेला काहीच सूचले नसल्यामुळे त्यांनी थेट अनमलाच मारण्याचा व त्यात शकीलला गोवण्याचा कट रचला. त्यांनी या घृणास्पद घटनेत अनमचे वडील अनीसलाही सहभागी केले. आता हे तिघे अनमला ठार मारण्याची संधी शोधत होते.
येथून सुरू होते मुलीच्या हत्येचा कट
अनमला ठार मारण्याचा कट वडील अनीस, काका शादाब व आजोबा शहजादे यांनी 1 महिन्यापूर्वी रचला. मुलीच्या हत्येचा मास्टरमाइंड तिचा चुलता शादाब व आजोबा होते. वडीलही भावाला वाचवण्यासाठी या कटात सहभागी झाले. या मारेकऱ्यांच्या मते, मुलगी पुन्हा जन्मेल. पण भाऊ तुरुंगात गेला तर कुटुंब उद्ध्वस्त होईल. त्यामुळे या तिघांनी मिळून 10 वर्षीय निष्पाप मुलीला निर्दयीपणे ठार मारले.” हा खुलासा या मारेकऱ्यांनीच पोलिस चौकशीत केला.
आरोपी चुलत्याचा कबुलीजबाब
आरोपी चुलता शादाबने पोलिसांना सांगितले, "महिन्याभरापूर्वी आम्ही या हत्येचा कट रचला. त्यानंतर अनमला मारण्याची संधी शोधली. आम्ही यापूर्वीही एकदा प्रयत्न केला. पण ती वाचली. त्यामुळे आम्ही नंतर अधिक कठोर कट रचला. अनमला यात्रा पाहण्याची आवड होती. गावात यात्रा भरली होती. माझ्या मोठ्या भावाने यात्रेत दुकान लावले होते. घरी वडील शहजादे सर्वकाही पाहत होते. आम्ही सातत्याने एकमेकांशी फोनवरून संपर्कात होतो."
"सायंकाळी मी अनमला यात्रेत येण्याची विचारणा केली. ती खूश झाली. मी तिला हे कुणालाही न सांगण्याची तंबी दिली. ती तयार झाली. त्यानंतर मी तिला घराबाहेर बोलावले. आम्ही पायीच यात्रेत गेलो. मी माझ्या पुतणीला मारणार हे मला माहिती होते. त्यामुळे मी तिच्या आवडीची प्रत्येक गोष्ट तिला खाऊ घातील. झोकाही खेळवला. तिने काही खेळणी मागितली. पण मी घेऊन दिली नाही. कारण, ती ते खेळू शकणार नाही हे मला माहिती होते."
"आम्ही यात्रा फिरल्यानंतर वडिलांकडे पोहोचलो. माझ्या भावाने पूर्वीपासूनच झोपेच्या गोळ्या खरेदी केल्या होत्या. अनमला बेशुद्ध केल्याशिवाय ठार मारणे शक्य नव्हते. तसेच आम्हाला ती यात्रेतून हरवल्याचेही सिद्ध करावे लागणार होते. मी तिला तिच्या वडिलांकडे सोपवून जेवण्यास गेलो. मला वहिणींनी अनमची विचारणा केली. त्यावर मी ती भावाकडे असल्याचे सांगितले. तिकडे यात्रेत माझ्या भावाने तिला ज्यूसमधून झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर तिला घराकडे घेऊन येऊ लागले. रस्त्यात अनमची शुद्ध हरपली. तेव्हा भावाने तिला एका शेतातील पेंढ्यांखाली लपवले. त्यानंतर ते पुन्हा दुकानात गेले."
"दुसरीकडे, अनम उशिरापर्यंत घरी आल्यानंतर आम्ही तिचे अपहरण झाल्याचे नाटक केले. भावाला फोन केला तर त्यानेही अनम आपल्याकडे नसल्याचे सांगितले. आम्ही तिला शोधण्याचे नाटक केले. मशिदीतूनही घोषणा केली. मी व अब्बू कुटुंब व गावातील लोकांना अनमला लपवल्या ठिकाणी जावू देत नव्हतो. मी व माझ्या भावानेच ती जागा ठरवली होती."
"आम्ही लोकांपुढे ही बाब पोलिसांना सांगितल्याचे नाटक केले. फोन लावल्याचाही बनाव केला. पोलिस अनमचा सकाळी शोध घेणार असल्याचे खोटे सांगितले. त्यामुळे अनमचा पहाटे 4 वाजेपर्यंत शोध घेऊन आम्ही घरी परतलो. आम्ही कुटुंबीयांचे खोटे सांत्वनही केले. सर्वजण घरी गेल्यानंतर आम्ही तिला शोधण्याच्या नावाने पुन्हा घराबाहेर पडलो."
"अनमला मारण्यासाठी चाकू यापूर्वीच घरापासून काही अंतरावर लपवला होता. भावाने अनमला बाहेर काढले असता ती बेशुद्धच होती. मी व अब्बूने प्रथम अनमला दगडाने मारले. मोठा भाऊ अनीसनेही मुलीच्या शरीरावर दगडाने मारहाण केली. त्यानंतर आम्ही तिचे जॅकेट खोलून चाकू पोटात मारला. प्रथम अनीसच तिला मारणार होता. पण त्याची हिंमत झाली नाही."
"त्यांनी मला चाकू दिला. मी तोंड फिरवतो तू चाकू मार असे ते म्हणाले. त्यांनी सांगितले तसे मी केले. अनमच्या पोटात चाकू मारल्यानंतर तो फिरवून बाहेर काढला. यामुळे तिची कातडी बाहेर पडली. जवळपास अर्धा तास आम्ही तिला मरताना पाहिले. तिने ओरडू नये म्हणून वडिलांनी तिचे तोंड दाबून धरले होते. "
"अनमची शुद्ध हरपल्यानंतर आम्हाला वाटले तिचा मृत्यू झाला. आम्ही उचलून तिला गव्हाच्या शेतात टाकले. मी तिचा बूट उचलून शेताबाहेर टाकला. त्यानंतर आम्ही रडत घरी पोहोचलो. ती कुठेच आढळली नसल्याचे घरच्यांना सांगितले."
"त्यानंतर आम्ही तिचा शोध घेत पुन्हा घटनास्थळी पोहोचलो. तिथे आम्हाला आम्हीच टाकलेला बूट दिसला. ते पाहून मी जोरात ओरडलो. माझा आवाज ऐकून मोठा भाऊ व अब्बू आले. गावातील लोकही आले. आम्ही शेतात जाऊन पाहिले तर अनम जिवंत होती. ते पाहून आम्ही घाबरलो."
"माझे अब्बू माझ्याकडे पळत आले. त्यांनी तिला रडत विचारले, तुला कुणी मारले. गावातील लोकांनी ही गोष्ट पोलिसांना कळवण्याची सूचना केली. पण आम्ही त्यांना फोन केला नाही. आम्ही ती मरण्याची वाट पाहिली. काहीवेळ विव्हळल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर आम्ही ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस येताच आम्ही शकीलवर संशय व्यक्त करून त्याला फसवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिस नंतर पोलिस चौकशीत आमच्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला."
घरात या कटाची कुणालाच माहिती नव्हती -आरोपी काका
आरोपी काका शादाबने पुढे सांगितले की, "या प्रकरणाची घरातील इतर कुणालाच माहिती नव्हती. वहिणींनाही ही गोष्ट माहिती नव्हती. त्यांना अनमच्या मृत्युचा धक्का बसला आहे. त्यांना वाटते ती परत येईल. त्यांची ही स्थिती पाहून आम्हाला वाईट वाटते. पण आम्ही मजबूर होतो. आम्ही जे कुटुंब वाचवण्यासाठी हे सर्वकाही केले, तेच आता पूर्णतः उद्ध्वस्त झाले आहे. आमच्या अटकेनंतर आता घरात सर्वांना वस्तुस्थिती समजेल."
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.