आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Government To Enact Strict Laws To Curb 'love jihad'; Announcement By Chief Minister Yodi Adityanath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्तर प्रदेश:...सुधारले तर बरे, अन्यथा ‘राम नाम सत्य’; लव्ह जिहादवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा

जौनपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लव्ह जिहादला रोखण्यासाठी सरकार प्रभावी कायदा तयार करणार - योगी आदित्यनाथ

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ अलाहाबाद हायकाेर्टाच्या आदेशाचा हवाला देत म्हणाले की, विवाहासाठी धर्मांतर गरजेचे नसून लव्ह जिहादला रोखण्यासाठी प्रभावी कायदा तयार करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. दरम्यान स्वत:ची ओळख लपवत महिलांच्या सन्मानासोबत खेळणाऱ्यांनी सुधरावे अन्यथा राम नाम सत्यची यात्रा पक्की असल्याचा कठोर इशारा त्यांनी दिला.

देवरिया व जौनपूर जिल्ह्यातील पोटनिवडणूक सभेत ते म्हणाले, अलाहाबाद न्यायालयाने निर्णय दिला आहे की, केवळ विवाहासाठी धर्मांतराला मान्यता मिळायला नको. यामुळे लव्ह जिहादला रोखण्यासाठी सरकार देखील प्रभावी कायदा तयार करणार आहे. पुढे ते म्हणाले, महिलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यानंतरही काही महिलांच्या सन्मानाशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास मिशन शक्ती कार्यक्रम तयार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून माता-भगिनींचा सन्मान केला जाईल. दरम्यान, शुक्रवारी अलाहाबाद उच्च न्यायालयाने केवळ विवाहासाठी धर्मांतरण वैध नसल्याचे सांगत एका जोडप्याची याचिका फेटाळून लावली होती.