आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये एका जोडप्याचा स्कूटीवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता हरदोईमध्येही असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दुचाकीस्वार एक तरुण समोर बसलेल्या आपल्या जोडीदारासोबत भरधाव वेगाने दुचाकी चालवताना दिसत आहे. आता पोलिस दुचाकीच्या क्रमांकाच्या आधारे दुचाकी चालवणाऱ्या जोडप्याची माहिती गोळा करत आहेत.
उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यात एका प्रेमीयुगुलाचा बाईकवर रोमान्स करतानाचा व्हिडिओ आज सकाळीच समोर आला आहे. हा व्हिडिओ सीतापूर रोडवरील इटौली गावाजवळचा आहे. व्हिडीओमध्ये एक तरुण वर्दळीच्या रस्त्यावर आपल्या प्रेयसीला बाइकच्या पुढे बसवून भरधाव वेगाने बाइक चालवताना दिसत आहे.
यादरम्यान हे जोडपे रोमान्स करतानाही दिसत आहेत. रस्त्याच्या मधोमध बाइकवर रोमान्स करतानाचा हा व्हिडिओ एका कारचालकाने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. याआधी लखनऊमध्ये स्कूटी आणि कारमध्ये उभे राहून रोमान्स करणाऱ्या जोडप्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
व्हिडिओ समोर आल्यानंतर कारवाई करण्यात आली होती. आता हरदोई जिल्ह्यात बाइकवर जोडप्याच्या रोमान्सचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर व्हिडिओमधील बाइक नंबरच्या आधारे पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचा नंबर ट्रेस होताच या जोडप्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.