आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांचे लाजिरवाणे वर्तन:मुलगी शोधण्याच्या बदल्यात SI ने दिव्यांग आईकडे मागितली लाच, महिलेने भीक मागून गाडीत भरले 12 हजारांचे डीझेल

कानपूर23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • प्रकरण उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील ठाणे चकेरी येथील सनिगवां गावचे आहे.

त्या आईला कोणत्याही परिस्थिती आपल्या 15 वर्षांच्या मुलीला शोधायचे होते. ती दिवसभर भीक मागायची आणि त्या निरीक्षकाच्या गाडीत डीझेल भरायची. त्याने याच्या बदल्यात तिच्या मुलीला शोधून देण्याचे आश्वासन दिले होते. एक महिना वाट पाहिल्यानंतर तिची अपेक्षा पूर्ण झाली नाही तेव्हा तिने DIG ची मदत घेतली.

प्रकरण उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यातील ठाणे चकेरी येथील सनिगवां गावचे आहे. अधिक्षक राजपाल सिंह या चौकीमध्ये तैनात आहेत, ज्यावर लाच मागितल्याचा आरोप आहे. येथे राहणारी गुडिया क्रुचेवर चालते आणि भीक मागून जगते. त्यांची 15 वर्षांची मुलगी महिनाभरापासून बेपत्ता आहे. एका दूरच्या नातेवाईकावर अपहरण केल्याचा आरोप आहे. आरोपी विवाहित आहे.

गुडियाच्या तक्रारीवरून पोलिसांनी हरवलेल्या व्यक्तीची नोंद घेतली. पण जेव्हा जेव्हा त्या मुलीच्या बेपत्ता असल्याची तक्रार घेऊ पोलिस ठाण्यात गेली तेव्हा तिला फटकारुन पळवून लावण्यात आले. ती महिला म्हणते की, आरोपीला एकदा पोलिस ठाण्यातही बोलवण्यात आले होते. पण काय माहिती का त्याला सोडून देण्यात आले.

लाच देण्याची ऑफर स्वीकारण्यास भाग पाडले
एके दिवशी अधिक्षक राजपालसिंग यांनी गुडियाला मुलगी शोधण्याच्या बदल्यात गाडीमध्ये डिझेल भरण्यास सांगितले. त्यांनी ऑफर स्वीकारली, त्यानंतर हे सत्र सुरुच राहिले. मात्र, जेव्हा ती महिला मुलगी शोधण्याविषयी बोलायची, अधिक्षक तिला आश्वासन द्यायचा. यानंतर कंटाळून या महिलेने DIG डॉक्टर प्रितिंदर सिंह यांच्याकडे मदत मागितली. गुडियाचा आरोप आहे की, तिने भीक मागून आतापर्यंत 10 ते 12 हजारांचे डिझेल भरले आहे.

आरोपीला अटक, मुलीच्या शोध घेत आहेत चार टीम
पीडितेची आई म्हणते की, ती मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ऑफिसपर्यंत तक्रार करण्यासाठी गेली होती. मात्र तिथेही तिचे कुणी ऐकले नाही. आता DIG ने त्या SI ला सस्पेड केले आहे. या प्रकरणाची विभागीय तपासणी केली जात आहे. मुलीच्या शोधासाठी चार टीम बनवण्यात आल्या आहेत.

दोन वर्षांपूर्वी झाला होता पतीचा मृत्यू
गुडीयाला तीन मुली आणि एक मुलगा आहे. पतीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. जवळपास अडीच महिन्यापूर्वी गुडियाच्या उजव्या पायात वेदना सुरू झाल्या. यानंतर संक्रमण पसरल्याने तिला आपला पाय कापावा लागला. पती नसल्यामुळे ती जवळच्या काली माता मंदिरात भीक मागून आपल्या मुलांचा सांभाळ करते.