आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh, Lucknow, Asaram Bapu; Asaram Bapu Praised In Uttar Pradesh Shahjahanpur Event

शाहजहांपूर तुरुंगातील घटना:आसारामने ज्या शहरातील तरुणावर बलात्कार केला, त्या शहरातील कारागृहात त्याचा फोटो लावून ब्लँकेटचे वाटप करण्यात आले

लखनऊएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साक्षीदाराच्या हत्येच्या आरोपींनी वाटले ब्लँकेट

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर तुरुंगात बलात्कारातील आरोपी आसारामचे फोटो लावून ब्लँकेटचे वाटप केल्याप्रकरणी तुरुंग प्रशासन वादात अडकले आहेत. आसारामवर याच शहरातील तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या वडिलांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत, चौकशीची मागणी केली आहे.

साक्षीदाराच्या हत्येच्या आरोपींनी वाटले ब्लँकेट

तुरुंग प्रशासनाने प्रेस नोट जारी करुन याला सरकारी कार्यक्रम जाहीर केले आहे. यात सांगण्यात आले की, लखनऊमधील आसाराम बापू आश्रमाकडून हे ब्लँकेट देण्यात आले आहेत. अर्जुन आणि नारायण पांडेयकडून हे ब्लँकेट वाटण्यात आले आहेत. धक्कादायक म्हणजे, अर्जुन आणि पांडेय आसाराम केसमधील साक्षीदाराच्या हत्येतील आरोपी आहेत. ते याच तुरुंगात बंद होते, सध्या जामीनावर त्यांची सुटका झाली आहे.

आसाराम जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे

आसारामने 2013 मध्ये शाहजहांपूरमधील एका विद्यार्थींनीवर बलात्कार केला होता. 2018 मध्ये राजस्थानच्या जोधपूर कोर्टाने याप्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

बातम्या आणखी आहेत...