आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्म परिवर्तनवर ATS ची कारवाई:लखनऊतून दोन मौलानांना अटक, पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI करत होती फंडिंग, एक हजार गरीब हिंदूंचे धर्मांतर केले

लखनऊएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मोटिवेशनल थॉटद्वारे हिंदूंचे धर्मांतर केल्याप्रकरणी यूपी एटीएसने दोन मौलानांना लखनऊ येथून अटक केली आहे. एटीएसची टीम सुमारे चार दिवस त्यांची चौकशी करून पुरावे गोळा करत होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था ISI त्यांना आर्थिक मदत करीत होती.

अटक केलेले मौलाना जहांगीर आणि उमर गौतम हे लखनऊमधील एका मोठ्या मुस्लिम संघटनेशी संबंधित आहेत. एटीएस अधिकाऱ्यांनुसार ते गरीब हिंदूंना लक्ष्य करायचे. आतापर्यंत सुमारे एक हजार लोकांचे धर्मांतर करण्यात आले असून यामध्ये मोठ्या संख्येने मूकबधिर आणि महिलांचा समावेश आहे.

रामपूरमधील एका गावात दोन हिंदू मुलांची जबरदस्ती सुंता (खतना) करुन धर्मांतर करण्यामध्ये एक मौलानाचा हात असल्याचे समोर आले आहे. हे दोघेही पश्चिम यूपीमधील रहिवासी आहेत. यांना परदेशातून कार्यरत असलेली एक मुस्लिम संघटना आर्थिक मदत करत होती. एटीएस त्यांच्याविषयी माहिती गोळा करत आहे.

दोघेही दावा नावाने इस्लामिक सेंटर चालवतात
दोन्ही मौलाना दावा इस्लामिक सेंटर नावाची संस्था चालवतात. 3 जून रोजी दिल्लीच्या दासना मंदिरात दोन मुस्लिम मुलांनी पुजारीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्या दोघांनाही पकडल्यानंतर मौलाना उमर आणि जहांगीर यांच्याविषयी माहिती मिळाली.

कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथे धर्म परिवर्तन केले आहे.
या मौलानांनी नोएडा डेफ सोसायटीतील मूक-बधिर शाळेतील विद्यार्थ्यांना आमिष दाखवून आणि प्रलोभन देऊन धर्म परिवर्तन करून घेतले आहे. धर्मांतर झालेल्या झालेल्या एक हजार महिला आणि मुलांची यादी प्राप्त झाली आहे. कानपूर, वाराणसी आणि नोएडा येथील अनेक मुले व स्त्रिया यांचेही धर्मांतर झाले आहे. कानपूरमधील मुलाला दक्षिणेकडील शहरात नेण्यात आले आहे. एसटीएफ त्याचा शोध घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...