आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवरात्रीत मटण खाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे पतीने पत्नीची हत्या केल्याची घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. या व्यक्तीने प्रथम आपल्या पत्नीचा खून केला. त्यानंतर तिची डेडबॉडी शेतातील विहिरीत टाकली. एवढेच नाही तर मृतदेह कुजून त्याची लवकर माती व्हावी यासाठी त्याने त्याच्यावर मीठही टाकले. नवरात्रीच्या दिवसांत केवळ मटण खाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे निर्दयी पतीने हे अमानुष पाऊल उचलले. नॉन व्हेज खाण्याच्या इच्छेमुळे पत्नीचा जीव गेला. पतीच तिचा यमदूत ठरला.
नवरात्रीत मांस खाण्याच्या इच्छेने घेतला बळी
उत्तर प्रदेशच्या शामलीमध्ये ही घटना घडली. पोलिसांना गत शुक्रवारी गावातीलच एका विहिरीत महिलेचा मृतदेह आढळला. हा मृतदेह कुणाचा हे 2 दिवस समजले नाही. अखेर पोलिसांनी तपासाची वेगवान चक्रे फिरवून या प्रकरणाचा गुंता सोडवला. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवल्यानंतर तिचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. महिलेच्या डोक्यावर जखमांच्या खुना होत्या. त्यानंतर पोलिसांनी या डेडबॉडीची ओळख पटवण्यास सुरुवात केली असता तो शामलीच्या फतेहपूर येथील ईशा नामक महिलेचा असल्याचे निष्पन्न झाले.
काही महिन्यांपूर्वीच झाले होते लव्ह मॅरेज
यासंबंधीच्या माहितीनुसार, ईशा 2 मार्च रोजी आपल्या घरातून बेपत्ता झाली होती. त्यानंतर ती 13 मार्च रोजी घरी परत आली. तिने आपल्या कुटुंबीयांना आपण बंतीखेडा येथील आशू नामक तरुणाशी प्रेमविवाह केल्याची गोष्ट सांगितली. त्यानंतर 17 मार्च रोजी ती पुन्हा घरातून बेपत्ता झाली.
आशू व ईशा शामलीच्या एका महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. ईशा लग्नानंतरही आपल्या माहेरीच राहत होती. पण मध्ये-मध्ये ती आशूच्या घरी येत होती. नवरात्रीतही ती आशूकडेच होती. यावेळी तिने आशूकडे मटण खाण्याची इच्छा व्यक्त केली. आशूने नवरात्रीचे कारण देत तिची इच्छा पूर्ण करण्यास नकार दिला. यामुळे ईशा नाराज झाली. दोघांतील वाद वाढला. पण नवरा - बायकोतील या वादाचे रुपांतर ईशाच्या हत्येत होईल असे कुणालाही वाटले नाही. पण घडले ते उलटेच.
खून केल्यानंतर मृतदेह विहिरीत टाकला
बायकोने नवरात्रीच्या दिवसांत मटण खाण्याची इच्छा व्यक्त केल्यामुळे आशू नाराज झाला होता. त्याने रात्री संधी साधून ईशाच्या डोक्यात काठीने वार केला. त्यात ईशाचा जागीच मृत्यू झाला. आशूने पत्नीचा खून केला होता. आता त्याला तिच्या डेडबॉडीचा निपटारा करायचा होता. त्याने एक प्लॅन तयार केला. त्याने ईशाचा मृतदेह गावातील एक विहिरीत नेऊन टाकला. डेडबॉडी लवकर कुजावी म्हणून त्याच्यावर मीठही टाकले. असे केल्याने हा खून आपण पचवू असा त्याचा व्होरा होता. पण अखेर पोलिसांनी 2 दिवसांतच या प्रकरणाचा गुंता सोडवला. त्यांनी आरोपी आशूला अटक केली. आशू व ईशा हे दोघेही वेगवेगळ्या धर्मांचे होते. त्यामुळे पोलिस या अंगानेही तपास करत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.