आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील बाराबंकीच्या एका 63 वर्षीय वृद्धाने आपल्याहून जवळपास 40 वर्ष लहान एका तरुणीशी लग्न केले आहे. या व्यक्तीला 6 मुली आहेत. त्या सर्वांचे लग्न झाले आहे. 3 वर्षांपूर्वी या व्यक्तीच्या पत्नीचाही मृत्यू झाला. त्यामुळे या व्यक्तीने आपल्या उतारवयात पुन्हा बोहल्यावर चढून स्वतःचे एकटेपण दूर केले. या वृद्धाने स्वतःच्या मुलीच्या वयाच्या तरुणीशी केलेले लग्न सोशल मीडियासह पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरला आहे.
रांचीची आहे दुसरी पत्नी
बाराबंकीच्या सुबेहा पोलिस ठाणे हद्दीतील जमीन हुसैनाबाद पूरे चौधरी गावचे आहे. येथील नकछेद यादव यांच्याशी लग्न करणारी तरुणी नंदनी रांचीची आहे. तिचे वय केवळ 24 वर्षांचे आहे. म्हणते ती नकछेद यांच्या मुलीच्या वयाची आहे.
सर्वच मुलींचे झाले आहे लग्न
नकछेद यादव यांनी सांगितले की, "पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर मी एकटा पडलो होतो. त्यातच सर्वच मुलींचे लग्नही झाले आहे. सर्वजण आपापल्या सासरी गेल्या. त्यामुळे माझ्या खाण्यापिण्याची आबाळ होत होती. परिणामी मी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला. या लग्नामुळे आम्ही दोघेही खूप आनंदी आहोत."
रुदौलीच्या कामाख्या देवी मंदिरात केले लग्न
नकछेद यांनी सांगितले की, अयोध्येच्या रुदौली येथील कामाख्या देवी मंदिरात आमचे लग्न झाले. लग्न लावून देणाऱ्या पंडित शीतला प्रसाद यांनी सांगितले की, हे लग्न हिंदू रितीरिवाजाप्रमाणे झाले. प्रथम यज्ञ व नंतर वरमालाचा विधी झाला. लग्नात जवळपास 50 वऱ्हाडी व कुटुंबीय सहभागी होते. वराने जोरदार डान्स केला. रविवारीच नकछेद यांच्या घरी स्नेहभोजनही ठेवण्यात आले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.