आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्तर प्रदेश:उर्जा मंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी घेतले ताब्यात; नितीन राऊत यांचे जागेवरच ठिय्या आंदोलन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर प्रदेशातील आझमगड जिल्ह्यातील बांसा गाव येथील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारून क्रूर हत्या करण्यात आली. उत्तर प्रदेशातील दलितांच्या या वाढत्या हल्ल्याची गंभीर दखल अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने घेतली आहे. यासाठी या विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत हे गुरुवारी उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असताना आझमगडच्या सीमेवर उत्तर प्रदेशमधील पोलिसांनी डॉ. नितीन राऊत यांना पुढे जाण्यास मनाई केली असून त्यांना नजरकैद केले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांच्या या आडमुठे धोरणाला न जुमानता डॉ. नितीन राऊत त्या ठिकाणी रस्त्यावर खाली बसून शांततेच्या मार्गाने ह्या कृत्याचा विरोध करीत आहेत.

बसगाव येथे दलित सरपंचाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली झाली. त्याच्या कुटुंबीयांना भेटायला नितीन राऊत उत्तरप्रदेश येथे गेले आहेत. नितीन राऊत यांना ताब्यात घेतल्यामुळे यूपी पोलीस आणि राज्य सरकार असा वाद पेटण्याची चिन्ह आहे.

बातम्या आणखी आहेत...