आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Uttar Pradesh Special Task Force Convoy Vehicle Overturned In Kanpur Bringing Back VikasDubey, Vikas Dube Died News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानपूरवाला विकास दुबे ठार:काळ्या प्लास्टिकमध्ये गुंडाळला गेला 8 पोलिसांना ठार मारणाऱ्या गँगस्टरचा मृतदेह; पळून जाण्याचा प्रयत्न करताना झाला एनकाउंटर

कानपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपी एसटीएफ विकासला ट्रान्झिट रिमांडवर कानपूरला घेऊन जात होती

कानपूरच्या बिकरू गावात सीओसह आठ पोलिसांची हत्या करणारा कुख्यात गुंड विकास दुबे शुक्रवारी सकाळी चकमकीत ठार झाला. यूपी एसटीएफची टीम त्याला उज्जैनहून कानपूर येथे ट्रान्झिट रिमांडवर घेऊन जात होती. परंतु कानपूरपासून 17 किमी दूर सकाळी 6.30 वाजता ताफ्यातील एक गाडी उलटली.

विकास त्याच गाडीत बसला होता. अपघातानंतर विकासने पोलिसांकडील पिस्तुल हिसकावून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. यानंतर पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याच्या छातीत आणि कमरेत गोळी लागली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे सकाळी 7.55 वाजता त्याला मृत घोषित करण्यात आले. कानपूर रेंजच्या आयजीने विकासच्या मृत्यूची पुष्टी केली. विकास दुबेला गुरुवारी उज्जैनच्या महाकाल मंदिरातून अटक करण्यात आली होती. 

विकास दुबेला घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला
विकास दुबेला घेऊन जाताना पोलिसांच्या गाडीचा अपघात झाला

उज्जैनमध्ये अटकेवेळी ओरडला होता हिस्ट्रीशीटर - विकास दुबे हूं, कानपुर वाला

विकास दुबेला गुरुवारी सकाळी उज्जैन मंदिरात सकाळी 9 वाजेच्या सुमारास अटक केली होती. यावेळी घाबरलेला हिस्ट्रीशीटर अटकेवेळी ओरडत होता मी विकास दुबे आहे, कानपूरवाला. यानंतर पोलिसांनी त्याला अगोदर महाकाल पोलिस स्टेशन, पोलिस कंट्रोल रूम, नरवर पोलिस स्टेशन आणि नंतर पोलिस ट्रेनिंग सेंटर येथे नेले. येथे सुमारे दोन तास त्याच्याकडे चौकशी केली गेली. 

बातम्या आणखी आहेत...