आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तरप्रदेशातील गौतम बुद्धनगर मधील दनकौर भागात मंगळवारी सकाळी दाट धुक्यामुळे बस आणि कंटेनरची धडक झाली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताच्या वेळी बसमध्ये सुमारे 60 प्रवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धुक्यामुळे बसचालकाला दिसलेच नाही
उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये धुक्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे आग्रा-नोएडा मार्गावरील दनकौर परिसरात पेरिफेरल आणि गलगोटिया दरम्यान बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली, 10-15 लोक जखमी झाले. या अपघातात एकाचा मृत्यू झालेला आहे. धुके जास्त असल्याने बस कंटेनरला धडकली आणि रेलिंगवरून खाली पडली. सर्व जखमींना वाचवण्यात येत असून त्यांना रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.
पोलिसांनी जखमींना केली मदत
गौतम बुद्ध नगर पोलिसांनी सांगितले की, आग्रा ते नोएडा या महामार्गावर बस आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात 10-15 लोक जखमी झाले आहेत. पोलीस सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करत आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाटेत कंटेनर अचानक थांबला. दाट धुक्यामुळे पाठीमागून येणाऱ्या बसला कंटेनर दिसत नव्हता आणि ती कंटेनरला धडकून रेलिंगवरून खाली पडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.