आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand | 14 People Died After The Vehicle They Were Travelling Fell Into A Gorge Near Sukhidhang Reetha Sahib Road

दुर्घटना:लग्न सोहळा आटोपून घरी परतत असलेली कार दरीत कोसळली, 14 जागीच ठार; उत्तराखंडमधील कुमाऊंतील घटना

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील कुमाऊं येथे एका रस्ते अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. रिपोर्टनुसार, सर्व लोक लग्न समारंभातून परतत होते. यादरम्यान कार दरीत कोसळल्याने सर्वांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर सर्व मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी तात्काळ ग्रामस्थ आणि पोलिस दाखल झाले. त्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 13 मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात आले आहेत. अद्यापही घटनास्थळावर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. गाडी खोल दरीत कोसळल्यामुळे मृतदेहांची ओळख पटवणेही अवघड जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार या गाडीतील सर्व प्रवासी हे टनकपूर येथील पंचमुखी धरमशाळा येथे लग्नासाठी गेले होते. लग्न सोहळा आटोपून ते आपल्या घराकडे निघाले होते. दरम्यान रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. रात्री जवळपास तीन वाजता ही दुर्घटना घडली. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक

बातम्या आणखी आहेत...