आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या हल्द्वानीमध्ये एका भरधाव वेगाने जाणाऱ्या सफारी कारने 2 स्कुटीस्वार तरुणींना जोराची धडक दिली. त्यात 22 वर्षीय हर्षिताचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर तिची मैत्रिण लवी जोशी गंभीर जखमी झाली. तिला गंभीर स्थितीत लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना 8 मार्च रोजी म्हणजे होळीच्या दिवशी घडली. पण ती आता उजेडात आली आहे. पोलिसांनी आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. आरोपीचे नाव किरण जोशी असून, तो पिथौरागडचा आहे.
घटनेचे CCTV फुटेज झाले व्हायरल
या घटनेचे CCTV फुटेज समोर आले आहे. त्यात एक सफारी कार स्कुटीस्वार तरुणींना धडक देऊन पळून जाताना दिसून येत आहे. धडक लागल्यानंतर दोन्ही तरुणी स्कुटीसह दूरवर फरफटत जातात. विशेष बाब म्हणजे धडक देणाऱ्या स्कुटीला धडक देणाऱ्या कारवर पोलिसांचे स्टीकर आहे. त्यामुळे ती एखाद्या पोलिस कर्मचाऱ्याची असल्याचा दावा केला जात आहे.
दुसरीकडे, अपघातानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरून कारसह वेगाने पोबारा करत असल्याचेही दिसून येत आहे. एक स्कुटीस्वार त्याचा पाठलाग करतो. पण कारचा वेग जास्त असल्यामुळे त्याला ती पकडता येत नाही.
पोलिसांवर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर पोलिसांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कारण धडक देणारी कार एका पोलिस उपनिरीक्षकाची असल्याचा दावा केला जात आहे. ती काही महिन्यांपूर्वी एका ऑटो डीलरला विकली गेली होती. तपासात ही गाडी अद्याप पोलिसांच्या नावावर असून तिचे हस्तांतरण होणे बाकी असल्याचे आढळून आले. आरोपी किरण जोशीला अटक केल्यानंतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
अपघाताशी संबंधित खालील बातमी वाचा...
दिग्विजय यांच्या कारची तरुणाला धडक:दुचाकीस्वार 10 फूट दूर पडला; पोलिसांनी जप्त केली माजी मुख्यमंत्र्यांची गाडी
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांच्या कारने गुरुवारी एका दुचाकीस्वाराला धडक दिली. तो सुमारे 10 फूट दूर पडला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याला भोपाळला रेफर करण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील ही घटना आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.