आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडमध्ये भारतीय जनता पार्टीने तीन दिवसांच्या आतच दुसरा मोठा बदल केला आहे. आधी मुख्यमंत्री बदलण्यात आले होते. आता प्रदेशाध्यक्ष बन्शीधर भगत यांनाही हटवण्यात आले आहे. त्यांच्या जागी मदन काैशिक यांना प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजप सरचिटणीस आणि मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांनी प्रदेशाध्यक्षांबाबत एक पत्र जारी केले आहे. त्यात लिहिले आहे की, आमदार मदन कौशिक यांना तत्काळ प्रभावाने उत्तराखंड भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त करण्यात आले आहे. या बदलानंतर नवनियुक्त मुख्यमंत्री तीरथिसंह रावत यांनी बन्शीधर भगत यांचा आपल्या मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तत्पूर्वी, शुक्रवार सकाळी मदन काैशिक यांनी प्रदेश भाजप प्रभारी दुष्यंतकुमार गाैतम यांची भेट घेतली होती.
विशेष म्हणजे दोनच दिवसांपूर्वी भाजपने त्रिवेंद्रसिंह रावत यांना हटवून तीरथिसंह रावत यांना मुख्यमंत्री केले होते. त्यांनी १० मार्चलाच पदाची शपथ घेतली होती. संध्याकाळी मंत्रिमंडळाचीही स्थापना केली होती. राजभवनात राज्यपालांनी बन्शीधर भगत, सत्पाल महाराज, हरकसिंह रावत यांच्यासह ११ आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली होती. नव्या सरकारमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत मंत्रिमंडळातील सात मंत्री कायम आहेत. चार नव्या चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.